बंगालमध्ये भाजपाच्या बैठकीत खोडा

पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीत तृणमुल समोर भाजपाचे तगडे आव्हान उभे आहे. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी भाजपाची बैठक उधळली गेली. सविस्तर वाचा नेमकी काय घटना घडली.......

बंगालमध्ये भाजपाच्या बैठकीत खोडा

तृणमुलचा हात असल्याचा भाजपाचा आरोप

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभेच्या जागांसाठी निवडणुका चालू आहेत. या निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा उद्या पार पडेल. त्यापुर्वी भाजपाने आज त्यांची चालू असलेली निवडणुक बैठक तृणमुळ काँग्रेसने बंद पाडल्याचा आरोप केला आहे.

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा येथे भाजपाची तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापुर्वी निवडणुक बैठक चालू होती. ही बैठक बंद पाडण्यात आली. भाजपाने यामागे तृणमुल काँग्रेसच्या समाजकंटकांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा:

आता गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या तत्त्वाला अनुसरून राजिनामा द्यावा

थोडी तरी लाज शिल्लक असेल तर राजीनामा द्या

अक्षयनंतर राम सेतू चित्रपटातील ४५ जणांना कोरोना

भाजपाच्या सांगण्यानुसार तृणमुल काँग्रेसच्या काही समाजकंटकांनी रविवारी रात्री भाजपाची बैठक बंद पाडली. त्याबरोबरच त्यांनी भाजपाचे होर्डिंग्ज आणि झेंडे यांना देखील आग लावली. परंतु या घटनेची माहिती मिळताच बेलघारिया पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी दोन्ही पक्षाच्या लोकांना दूर जायला लावलं.

बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस आणि भाजपा आमनेसामने आहेत. या निवडणुकांच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान अनुक्रमे २७ मार्च आणि १ एप्रिल रोजी पार पडला आहे. या टप्प्यात बंगालमध्ये भरघोस मतदान झाले आहे. यापुढे होणाऱ्या मतदानावर बंगालमध्ये  गेली सलग १० वर्षे असलेली तृणमुलची सत्ता उलथण्यात भाजपाला यश येणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Exit mobile version