पाच राज्यांतील निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर

पाच राज्यांतील निवडणुकांसाठी भाजपने कसली कंबर

भाजपची कार्यपद्धती ही कायम सुसंबद्ध राहिलेली आहे. याचे उदाहरण म्हणजे आगामी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा आता भाजपच्या माध्यमातून घेतला जात आहे. याकरता भारतीय जनता पक्षाने शनिवारी वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. राज्यांशी संबंधित राजकीय आणि कारभाराच्या मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री पक्षाचे स्थान अधिक बळकट व्हायला हवे, याकरता लक्ष केंद्रीत करीत आहेत. तसेच सरकारी योजनांमध्ये अजून कोणत्या सुधारणा व्हायला हव्या याचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. याचबरोबरीने अधिकाधिक जनमानसाचा पाठिंबा कसा मिळवता येईल यावरही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा:
आरबीआयच्या निर्णयाने ‘अर्थतज्ज्ञ’ राजकारणी अडचणीत

जम्मू काश्मीरनंतर लडाखच्या नेत्यांसोबत केंद्राची बैठक

जम्मू विमानतळाजवळ स्फोट

रावेरखेडी येथे होणार थोरल्या बाजीराव पेशव्यांचे स्मारक

पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या विचारमंथन सत्रात अनेक केंद्रीय मंत्री बैठकीस उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख जे पी नड्डा यांनी ही बैठक बोलविली होती. या बैठकीला गृहराज्यमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंग, निर्मला सीतारमण, नरेंद्रसिंग तोमर, स्मृती इराणी, पियुष गोयल आणि धर्मेंद्र प्रधान हे उपस्थित होते.

आगामी वर्षामध्ये पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे उत्तर प्रदेशमध्येही विधानसभा निवडणुक होणार आहे. त्यामुळे निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी भाजपने आत्तापासून कंबर कसलेली आहे. निवडणुकांसाठी कशापद्धतीने तयारी करायला हवी याकरता आता भाजपने दिशा निश्चित करण्याची सुरुवात केलेली आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या विधानसभा निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळात होणार आहेत.

केवळ पंजाब वगळता बाकीच्या सर्व राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच पंजाबसाठी कोणती रणनीती भाजप आता आखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीमध्ये पूर्ण तयारीनिशी उतरण्याची भाजपची शैली आहे. त्यामुळेच आता भाजपने जवळपास ६ महिने आधीपासूनच कामाला सुरुवात केलेली आहे.

बैठकीमध्ये पक्षाच्या नेत्यांनी या राज्यांमध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. तसेच भाजप नेतृत्त्वाने अनेकदा विविध मंत्रालये आणि पक्ष संघटनेत समन्वय साधण्यावर भर दिला असल्याचे आपल्याला अनेकदा दिसून आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात भाजपच्या प्रमुख रणनीतिकारांशी बैठक घेतली होती.

Exit mobile version