30 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणआव्हाडांना हाकला!

आव्हाडांना हाकला!

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे नवनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक होऊन जामीन मिळाल्याची बातमी उघड झाल्यानंतर आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी कडून आव्हाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

गुरुवार, १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली असून तात्काळ जामीन मंजूर केला गेला. गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास वर्तकनगर पोलीसांनी आव्हाडांना अटक करून ठाणे येथील न्यायालयात हजर केले. तर न्यायालयाने दहा हजार रुपयांच्या बाँडवर आव्हाड यांना जामीन मंजूर केला. पण जामीन मंजूर झाला असला तरीही आव्हाड यांना मंत्रिमंडळात राहण्याच अधिकार नाही त्यामुळे त्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे अशी मागणी भाजपा नेत्यांकडून होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?

आर्यन खान आणखी ६ दिवस तुरुंगातच

‘कोण जाणे पवारांना कसली वेदना आहे?’

अनंत करमुसे प्रकरणात जितेंद्र आव्हाडांना अटक! पण तात्काळ जामीन

भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट करत या संदर्भातील मागणी केली आहे. “दसऱ्याच्या निमित्ताने भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या अटकेला प्रारंभ झाला. पण केवळ अटक करून बेलवर हे प्रकरण थांबणार नाही. अटक झालेला मंत्री मंत्रिमंडळात कसा? आव्हाडांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी केली नाही तर आम्ही राज्यपालांना विनंती करू. गुंड, मवाली अशा लोकांचे हे सरकार आहे आणि मुख्यमंत्री मुग गिळून बसल्येत आणि यांचे जेष्ठ नेते मात्र केंद्र सरकारवर टीका करत आहेत. आव्हाडांचा नंबर पहिला लागला, आता लवकरच देशमुखांचा आणि अन्य लोकांचा लागेल” असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

तर भाजपा नेते किरीट सोमय्या आणि भाजपा ठाणे शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी देखील याच प्रकारची मागणी केलेली दिसते. ट्विटरच्या माध्यमातून सोमय्या आणि डावखरे यांनी आव्हाडांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. त्यामुळे आव्हाड हे मंत्रिमंडळात राहणार की त्यांची हकालपट्टी होणार? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा