27 C
Mumbai
Monday, December 30, 2024
घरराजकारणभाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी

भाजपाचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या दारी

Google News Follow

Related

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा शिष्टमंडळ राजभवनावर दाखल झाले. राज्यातील विविध प्रश्नांना घेऊन या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे निवेदन दिले आहे.

बुधवार, २३ जून रोजी महाराष्ट्र भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यातल्या विविध विषयांना घेऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासमोर आपली भूमिका मांडली. यावेळी राज्य विधिमंडळाचे होऊ घातलेले अधिवेशन, विधानसभेच्या अध्यक्षांची नियुक्ती, ओबीसी समाजाचे आरक्षण अशा विविध विषयांना धरून भाजपाने आपल्या मागण्या राज्यपालांसमोर ठेवल्या आहेत.

हे ही वाचा:

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?

निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन

ठाकरे सरकारची आता राष्ट्रवादीच्या निर्णयालाही स्थगिती

महाराष्ट्र सरकारने दोन दिवसांचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन घेण्याचे ठरवले आहे. पण भाजपने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवावा ही मागणी भाजपाने राज्यपालांकडे केली आहे. तर विधानसभेच्या अध्यक्षांची नियुक्ती न करता संविधानिक व्यवस्था कोलमडल्याबाबत राष्ट्रपती महोदयांना अहवाल पाठवून कळवले जावे अशीही मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे. तर राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केले गेले असताना हे आरक्षण पूर्ववत होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी भाजपाने राज्यपालांकडे केली आहे.

राज्यपालांना भेटलेल्या या शिष्टमंडळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड, योगेश सागर, मनिषाताई चौधरी आणि इतर नेत्यांचा समावेश होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा