निलंबनाची कारवाई झालेले भारतीय जनता पार्टीचे आमदार सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. तब्बल ३५ मिनिटे झालेल्या या भेटीमध्ये राज्यपालांनी या बारा आमदारांची बाजू ऐकून घेतली असून कायद्यानुसार योग्य ती पाऊले उचलण्याचे आश्वासन निलंबित आमदारांना दिले आहे. तर राज्यपालांशी झालेल्या या भेटीनंतर भाजपच्या आमदारांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी ‘ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा काढली आहे’ असे म्हणत सरकारची पिसं काढली आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी सभागृहात अथवा दालनात कोणत्याही प्रकारचा अपशब्द उच्चारलेला नाही. भाजपावर खोटे आरोप करून एकतर्फी कारवाई केली आहे. आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही असा आरोप शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील मंत्री ज्या गोष्टी पसरवत आहेत ते कुठल्याही शहाण्या माणसाला लक्षात येईल की त्यात अशी कोणतीही गोष्ट नाही ज्यातून तालिका अध्यक्षांचा अपमान होईल. त्यामुळेही ही कारवाई म्हणजे एक तर्फा असते गोष्टींवर अजून ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची प्रेत यात्रा काढली आहे असा घणाघात आशिष शेलार यांनी केला.
हे ही वाचा:
‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं
२ महिन्यात राज्यातील ७ कोटी ‘गरिबांचे कल्याण’
भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा!
या मुस्कटदाबीला आम्ही घाबरणार नाही. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाची लढाई आम्ही लढत आहोत. त्याला या प्रकारातून अजून गती मिळाली असून आणि जनतेत आम्ही आणखीन गतीने जाऊ असे अशिष शेलार यांनी सांगितले. तर ठाकरे सरकारने हा बारा आकडा पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केलेली दिसते असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्यातले काही सदस्य हे ना सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांच्या इथे गेले होते. किंवा त्यांच्या दालनातही गेले नव्हते. तरी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे असा दावा हर्शेल यांनी केला आहे