विधानसभा निवडणूक २०२४ साठी महायुतीमधील भाजपाकडून निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनीही आपल्या पक्षांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. अजूनही काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये कलह सुरू असून यावर तोडगा काढण्याचे कामही सुरू आहे. तर, दुसरीकडे महायुतीमध्ये मात्र जागा वाटपाचे काम शांतपणे सुरू असून प्रत्येक पक्ष आपापल्या सोयीने उमेदवारांची यादी जाहीर करत आहे.
एका टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये भाजपाने एकूण २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यापूर्वी महायुतीमधून भाजपानेचं सर्वप्रथम विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या पहिल्या यादीत अनेक वरिष्ठ नेत्यांची नावे होती त्यामुळे दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष होते.
पहिल्या यादीमध्ये भाजपाने ९९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजपकडून आणखी २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे, भाजपाकडून आत्तापर्यंत १२१ उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.
दुसऱ्या यादीत धुळे ग्रामीणमधून भाजपाने राम भदाणे यांना उमेदवारी दिली आहे. तर, मलकापूरमधून चैनसूख संचेती यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अकोटमधून प्रकाश भारसाखळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जतमधून भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, पक्षाने देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य या मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले आहे.
हे ही वाचा..
ठाकरे गट, काँग्रेसनंतर शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर; ६७ जागांवर दिले उमेदवार
भगव्या ध्वजाला नमन करत अतुल भातखळकरांच्या प्रचाराला प्रारंभ!
फटाके फोडण्यावरून भिलवाडामध्ये हिंसाचार
बांगलादेशमध्ये सनातन जागरण मंचची भव्य रॅली
भाजपाच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार
- राम भदाणे- धुळे ग्रामीण
- चैनसुख संचेती – मलकापूर
- प्रकाश भारसाखळे – अकोट
- विजय अग्रवाल – अकोला पश्चिम
- श्याम खोडे – वाशिम
- केवलराम काळे – मेळघाट
- मिलिंद नरोटे – गडचिरोली
- देवराम भोंगले – राजुरा
- कृष्णलाल सहारे – ब्रह्मपुरी
- करण देवताळे – वरोरा
- देवयानी फरांदे – नाशिक मध्य
- हरिश्चंद्र भोये -विक्रमगड
- कुमार आयलानी – उल्हासनगर
- रवींद्र पाटील – पेण
- भीमराव तापकीर – खडकवासला
- सुनील कांबळे – पुणे छावणी
- हेमंत रासने – कस्बा पेठ
- रमेश कराड – लातूर ग्रामीण
- देवेंद्र कोठे – सोलापूर शहर मध्य
- समाधान आवताडे – पंढरपूर
- सत्यजित देशमुख – शिराळा
- गोपीचंद पडळकर – जत