भारतीय जनता पार्टीने विधानपरिषद निवडणुकीसाठी पाच नाव जाहीर केली होती. ज्यामध्ये नेते प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. मात्र, आता भाजपाने सहाव्या जागेसाठी रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांचे नाव निश्चित केले आहे.
सदाभाऊ खोत हे रयत क्रांतीचे अध्यक्ष होते. २०१६ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य जागेवरून विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले होते. त्यांनतर आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी सवाव्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. सदाभाऊ खोत हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. उमा खापरे ह्या पाचव्या जागेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत गुरुवार, ९ जून रोजी म्हणजेच आज सदाभाऊ खोत यांचादेखील अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा:
सिद्धू मुसेवाला प्रकरणी, पुण्यातून सौरभ महाकाळला अटक
‘मुख्यमंत्र्यांचे भाषण एमआयएमची मतं मिळवण्यासाठी’
राजीव गांधींचा ‘तो’ फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराचे निधन
रोजीरोटी देईन, पाणी, रस्ते देईन तेव्हाच संभाजीनगर नाव होईल!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची नाव निश्चित करण्यात आली आहेत. तर शिवसेना आणि काँग्रेसनेही प्रत्येकी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या नव्या चेहऱ्यांना यंदा विधान परिषदेसाठी संधी दिली आहे. उमा खापरेंच्या रुपाने महिला मोर्चाच्या नेतृत्वाला प्रतिनिधित्व मिळालं आहे. तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.