सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. असे असतानाच आता दुसरीकडे विधानपरिषदेवरून चर्चा रंगण्यास सुरवात झाली आहे. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणुक होणार असल्याचे गेल्या महिन्यात जाहीर झाले होते. त्यानुसार बुधवार, ८ जून रोजी भारतीय जनता पार्टीने विधानपरिषदेसाठी पाच नावं निश्चित केली आहेत.
भाजपाकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय प्रसाद लाड आणि कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाने दोन नव्या उमेदवारांना संधी दिली आहे. यामध्ये उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय या दोन नावांचा देखील समावेश आहे. शिवसेनेकडून देखील मंगळवारी विधानपरिषदेसाठी दोन नावं जाहीर करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची नावे निश्चित झाली आहे.
हे ही वाचा:
हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कर्नाटकातून अटक
७५ किमीचा रस्ता पाच दिवसात बांधून भारताने रचला विक्रम
नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स आखाती देशांवर बरसले; ते टीकेच्याच लायक आहेत…
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन केंद्राचीच!
दरम्यान, भाजपाने उमा खापरेंना उमेदवारी दिल्यामुळे महिला मोर्चाच्या नेतृत्वाला प्रतिनिधित्व मिळालं आहे. तर प्रवीण दरेकर विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. विधानपरिषदेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे. यामध्ये रामराजे निंबाळकर, सुभाष देसाई, प्रविण दरेकर, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.