भाजपा नगरसेवक पूरग्रस्तांना करणार सढळ हस्ते ही मदत

भाजपा नगरसेवक पूरग्रस्तांना करणार सढळ हस्ते ही मदत

चिपळूण येथे पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या पाहणी प्रसंगी एका पूरग्रस्त महिलेने पोटतिडिकीने आक्रोश करत खासदार, आमदारांचा पगार पूरग्रस्तांसाठी वळवा अशी कळकळीची विनंती केली होती. त्याला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस वर्ग करण्याचा निर्णय घेतला असून तो निर्णय भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी जाहीर केला व तसे लेखी पत्र महापौर आणि महापालिका चिटणीस यांना पाठवले आहे.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले. अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटुंबीयांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. अशा प्रसंगी आपत्तीग्रस्त कुटूंबियांना उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची गरज आहे. पूरग्रस्त भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात मदतीच्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहेत.

हे ही वाचा:

आव्हाड, कोकण महाराष्ट्रात आहे, ते दुसऱ्याचे घर नाही!

न्यूज डंका, कारुळकर प्रतिष्ठानची पूरग्रस्तांना साथ; आपलाही हवा मदतीचा हात

अबब! तिने ६६ फुटांवरून केला अचूक थ्रो

भास्कर जाधव थोडी लाज बाळगा…

राज्यात कुठेही आपत्ती उद्भवल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुनर्वसनासाठी तातडीने मदत पोहोचवण्यात येते. या पार्श्वभूमीवर तातडीने भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त निधीस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली. त्यासंबंधीचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना देण्यात आले.

Exit mobile version