‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग सभा कशाला, प्रत्यक्ष बैठका घ्या!’

‘व्हीडिओ कॉन्फरन्सिंग सभा कशाला, प्रत्यक्ष बैठका घ्या!’

भाजपाने महापालिकेत केली निदर्शने

महापालिकेतील सर्व सभा प्रत्यक्ष घ्या व लसीचे दोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी कोविडचे सर्व नियम पाळत महापौर दालनाबाहेर जोरदार निदर्शने केली.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली आहे. राज्य शासनाने जास्त गर्दी होत असलेल्या मोहरमच्या मिरवणुकीस देखील परवानगी दिलेली होती. भारताचे सर्वोच्च सभागृह असलेली लोकसभा प्रत्यक्ष स्वरुपात होते. मात्र महापालिकेच्या वैधानिक समिती सभा व विशेष सभा अद्यापही प्रत्यक्ष न घेता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत ही अत्यंत खेदजनक बाब आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सभेत कोण सदस्य काय बोलला हे नीट ऐकू येत नाही तसेच प्रतिध्वनी ऐकू येतो. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील समस्या मांडता येत नाहीत. त्यामुळे सदर सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ऐवजी प्रत्यक्ष घेणे आवश्यक आहे असल्याची मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

हे ही वाचा:

सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का?

६७ टक्के पालक म्हणताहेत मुलांना शाळेत पाठवू

धूळ खात पडला आहे, अग्निशमन दलाचा ‘पांढरा हत्ती’

आयपीएलवर पुन्हा कोरोना संकट

महापालिका सभा व सर्व वैधानिक समित्यांच्या सभा आभासी पद्धतीने होत असल्याने पत्रकारांनाही या सभांमध्ये सहभागी होता येत नाही. प्रशासनाला वारंवार विनंती करूनही पत्रकारांना सभांमध्ये आभासी पद्धतीने आजवर सहभागी करून घेतलेले नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार तुम्हाला महापालिका सभेत का नको आहेत ? असा सवाल करत पालिकेतील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी व पारदर्शक कारभारासाठी महापालिकेच्या वैधानिक समिती व विशेष समिती सभा प्रत्यक्ष सभागृहात घेण्यात याव्यात तसेच सर्व सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश द्यावा अशी मागणी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

Exit mobile version