महानगरपालिकेतील निधी प्रकरणावरून शिवसेनेची आता चांगलीच कोंडी होणार आहे. पालिकेच्या महाप्रकल्पासाठी विशेष निधी प्रस्ताव आता चांगलाच चर्चेत आलेला आहे. निधी मिळवण्यासाठी पालिका आता ठेवी पणाला लावणार आहे. त्यामुळेच ठेवी मोडण्याच्या महानगर पालिकेच्या निर्णयाविरोधात आता भाजप आणि कॉंग्रेसने खोडा घातलेला आहे. त्यामुळेच आता शिवसेनेची चांगलीच कोंडी झालेली आहे.
सर्वच विरोधी पक्षांनी पालिकेच्या निधी मिळवण्यासाठीच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. तसेच प्रशासनाकडे फेरविचारासाठी हा प्रस्ताव परत पाठवावा लागत आहे. ७ हजार ८४४ कोटी रुपये महानगर पालिकेच्या महत्वाच्या विकास कामासाठी राखून ठेवण्याचा हा निर्णय होता. परंतु याकरता पालिकेच्या ठेवींमधून हा निधी वळविण्यात येणार होता.
हे ही वाचा:
सरकारचे बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष
इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारची महत्वाची पावले
…पडळकरांच्या गाडीवर हल्ला करण्याची म्हणून झाली ‘छाती’
उद्धव ठाकरे लोकप्रिय; मग वाझे टॉलस्टॉय आणि राहुल गांधी तेनाली रामन!
ठेवी वळविण्याकरता प्रशासनाने स्थायी समितीकडे याकरता मंजूरी मागितली होती. मुख्य बाब म्हणजे या निधीच्या माध्यमातून रस्ते, मलनिःसारणवाहिन्या तसेच पर्जन्यवाहीन्या याकरताचे प्रकल्प राबविण्यात येणार होते. त्याचबरोबरीने शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही याच निधीतून साकरण्याचा विचार होता. त्यामुळेच आता शिवसेनेनेही चांगलीच सावध भूमिका घेतलेली आहे.
दोन आठवड्यांपूर्वी मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर अजूनही कुठलाच निर्णय मात्र झालेला नाही. प्रशासनाने पालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि दीर्घकालीन नियोजन याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली होती. शिवाय पालिका ३ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च नेमका कुठून करणार आहे अशी माहितीही द्यायला हवी असे भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी यावेळी नमूद केले.