भाजपाने त्रिपुुरातील ग्राम पंचायती, जिल्हा परिषदांत काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टीचा सुपडा साफ केला!

भाजपाने त्रिपुुरातील ग्राम पंचायती, जिल्हा परिषदांत काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टीचा सुपडा साफ केला!

एकीकडे लोकसभेत भाजपाला मोठा धक्का बसलेला असताना त्रिपुरातील ग्रामीण निवडणुकांत मात्र भाजपाने दमदार कामगिरी केली आहे. काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष यांना दणका देत भाजपाने एकहाती ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा जिंकल्या आहेत.

त्रिपुरातील पंचायत निवडणुकात भाजपाने ५८८३ जागी विजय मिळविला आहे. ६३७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यात भाजपाला हे मोठे यश मिळाले आहे.

निवडणूक आयोगाने हाती आलेल्या निकालानुसार माहिती दिली की, विरोधी पक्ष कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसला प्रत्येकी १३८ जागा जिंकता आल्या. भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या टीआयपीआरए मोथा पक्षाने यावेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे ठरविले. पण त्यांना १०२ जागी यश मिळाले. अपक्षांच्या खात्यात २० ग्रामपंचायती आल्या.

हे ही वाचा:

वर्सोवा चौपाटीवर झोपलेल्याच्या अंगावरून गेली गाडी; दोघांना अटक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लोगोत शिवरायांची प्रतिमा !

नाझिया खान यांनी शिवम दुबेच्या पत्नीला केला सवाल, तुमचा विवाह मुल्ला-मौलवींना मान्य आहे काय?

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसला ८ जागा मिळाल्या तर कम्युनिस्ट पार्टीला ६ जागा मिळविता आल्या. भाजपाने तर ग्राम पंचायतीच्या जागांपैकी ७१ टक्के जागा याआधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. पंचायत समितीतही भाजपाने ६८ टक्के जागी विजय मिळविला. तर १७ टक्के जागा या जिल्हा परिषदेत जिंकल्या.

ग्राम पंचायतीच्या १८१९ जागांपैकी भाजपाने १४७४ जागा जिंकल्या. कम्युनिस्ट पार्टीला १४९ तर काँग्रेसला १५० जागी विजय मिळाला. जिल्हा परिषदेत भाजपाने ९६ पैकी ९३ जागी विजय मिळविला.

भाजपाचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर लोकांचा विश्वास आहे, हेच या निकालाने स्पष्ट केले आहे. साहा यांनी वन नेशन वन इलेक्शन या मोदी सरकारच्या घोषणेचेही स्वागत केले.

Exit mobile version