‘ते’ टूलकिट बनवणाऱ्याचे नाव समोर आल्याचा दावा

‘ते’ टूलकिट बनवणाऱ्याचे नाव समोर आल्याचा दावा

सध्या सोशल मीडियावर ज्या टूलकिटने वातावरण तापवलेले आहे ते बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. हे टूलकिट बनवणारी व्यक्ती ही काँग्रेसच्या एका बड्या नेत्यासोबत काम करत असल्याचाही दावा केला जात आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

मंगळवार, १८ मे रोजी समाज माध्यमांवर टूलकिटचा मुद्दा चांगलाच गाजला होता. हे टूलकिट काँग्रेसने तयार केले असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात होता. पण काँग्रेसकडून मात्र ते आरोप फेटाळले जात होते. काँग्रेसकडून विचारणा केली जात होती की हे नक्की कोणी बनवले आहे. अखेर त्या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी या टूलकिट बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड केले आहे. सौम्या वर्मा असे टूलकिट बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचा दावा संबित पात्रा यांनी केला आहे. त्यासोबतच त्यांनी सौम्या वर्मा यांचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोबतचे फोटो देखील सोशल मीडिया वर पोस्ट केले आहेत.

हे ही वाचा:

केरळातील डाव्यांची घराणेशाही उघड

केजरीवालांचे बेजबाबदार वक्तव्य- एस. जयशंकर

बंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाने घेतली दखल

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

काँग्रेसचे माजी खासदार आणि रिसर्च डिपार्टमेंटचे प्रमुख राजीव गौडा यांच्या सोबत सौम्या काम करत असल्याचा दावा केला जात आहे. तर सौम्या यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती असे सांगणाऱ्या काही बातम्याही पुढे आल्या आहेत. सौम्या वर्मा हिचे नाव समोर आल्यानंतर सौम्याने आपली ट्विटर, लिंक्ड इन अशा समाज माध्यमांवरील आपली खाती डिलीट केली आहेत.

Exit mobile version