आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयाचे जंगी स्वागत

आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयाचे जंगी स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील १२ आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर त्याचे स्वागत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने केले आहे. कांदिवलीत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

लोकशाहीचा विजय असो, भारत माता की जय, महाभकास आघाडीचा निषेध असो अशा घोषणा देत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाके वाजवून या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

यावेळी बोलताना भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, हा ऐतिहासिक निर्णय आहे. लोकशाहीचे रक्षण करणारा निर्णय. आमदारांचे आणि त्यांच्या मतदार संघातील जनतेला न्याय देणारा असा हा निर्णय आहे. सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही हो सकता है.

महाविकास आघाडीने जनतेचा आवाज दाबण्यासाठी हा निर्णय घेतला होता. त्यामुळेच न्यायालयाने लोकशाहीला मारक, अन्याय्य अशी ही निलंबनाची कारवाई असल्याचे म्हटले होते.म्हणूनच न्यायालयाने हा जो निर्णय घेतला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो.

हे ही वाचा:

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबलडेकर

सर्वोच्च न्यायालयाचा ‘मविआ’ला तडाखा

‘सर्वोच्च न्यायालयाचा देशासाठी दिशादर्शक निर्णय’

मैदानाला अनधिकृतरीत्या टिपूचे नाव देणाऱ्या सेनेला महात्मा गांधींच्या नावाचा विसर

 

लोकशाहीची हत्या संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीने केली आहे. त्यासाठी राऊत यांना वाटत असेल की सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा आहे तर त्यांनी न्यायालयावर टीका करावी आणि न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल शिक्षा सहन करावी.

महाराष्ट्रातील १२ आमदारांचे गेल्यावर्षी जुलै महिन्यातील अधिवेशनादरम्यान निलंबन झाले होते. एक वर्षासाठी त्यांचे निलंबन केल्याविरोधात आमदारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सदर निर्णय दिला.

Exit mobile version