सांगलीच्या अनुभवाने नाशिकमध्ये भाजपा सावध भूमिकेत?

सांगलीच्या अनुभवाने नाशिकमध्ये भाजपा सावध भूमिकेत?

नाशिक महापालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा एकदा मनसे टाळी देणार आहे. सभापतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला मदत करणार आहे. सांगली महापालिका निवडणुकीत महापौर पदाच्या निवडणूक झालेल्या पराभवानंतर भाजपा खबरदारी घेताना दिसत आहे.

नाशिक महापालिकेतील स्थायी समितीत, भाजप आणि महाविकास आघाडी दोघांचेही प्रत्येकी ८ सदस्य असल्यामुळे रंगत वाढली आहे. नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत मनसे किंगमेकर ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळे भाजपा खबरदारी घेताना दिसत आहे. नगरसेवकांचा घोडेबाजार टाळण्यासाठी, स्थायी समितीचे भाजपचे ८ सदस्य गुजरातला रवाना झाले आहेत.

हे ही वाचा:

मालवणीत मध्यरात्री घरासमोर येऊन जिहादी टोळके म्हणाले, रोहनला आमच्या ताब्यात द्या….

नाशिक महापालिकेत स्थायी समितीच्या सर्वच १६ सदस्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची महापौरांकडून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तौलनिक संख्याबळाच्या आधारे नाशिकच्या महापौरांनी स्थायी समितीचे सदस्य जाहीर केले. नाशिक महापालिकेत स्थायी समितीवर भाजपाचे ८, शिवसेनेचे ५, काँग्रेसचा १, राष्ट्रवादीचा १, तर मनसेचा १ सदस्य असेल. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा सामना होणार असल्यामुळे मनसे स्थायी निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहे.

नाशिक महापालिकेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. मात्र नाशिक रोड प्रभागाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. त्याशिवाय फुलेनगरच्या नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे भाजपचं संख्याबळही घटलं होतं.

Exit mobile version