24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणपंजाबमध्ये भाजपा-कॅप्टन-अकाली युती?

पंजाबमध्ये भाजपा-कॅप्टन-अकाली युती?

Google News Follow

Related

भाजपा, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माजी अकाली नेते सुखदेव सिंग धिंडसा यांच्या पक्षांसोबत युती करून पंजाबची निवडणूक लढवू शकते. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी सांगितले.

“आम्ही कॅप्टन (अमरिंदर सिंग) तसेच (अकाली दलाचे माजी नेते सुखदेव सिंग) धिंडसा यांच्याशी चर्चेत आहोत. आमची युती होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाचा प्रश्न आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलने संपवण्याचे मोठे मन दाखवत, शेतीचे कायदे तुमच्या फायद्याचे नाहीत, असे तुम्हाला वाटत असेल तर ते परत घेतले. मला वाटत नाही की पंजाबमध्ये आता कोणताही मुद्दा शिल्लक आहे. पंजाबमधील निवडणुका सरकारच्या गुणवत्तेवर लढल्या जातील.” असे शाह एका मुलाखतीत म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरवर विस्तृतपणे बोलताना, गृहमंत्री म्हणाले की निवडणुकांनंतरच राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जाईल. जे लोक त्याची मागणी करत आहेत ते केवळ राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

“जम्मू-काश्मीरमध्ये आधी राज्याचा दर्जा बहाल करावा आणि नंतर निवडणुका घ्याव्यात, अशी राजकीय मागणी आहे. प्रदेशात सीमांकनासाठी संसदेने कायदा केला आहे. त्यामुळे आधी परिसीमन होईल, मग निवडणुका होतील आणि राज्याचा दर्जा बहाल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मी हे अनेकवेळा सांगितले आहे, परंतु ते केवळ राजकीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.” असं शाह म्हणाले.

हे ही वाचा:

कोस्टल रोडच्या कामातही बीएमसीचा भ्रष्टाचार?

सावरकरांचा अपमान केल्यामुळे फडणवीसांची साहित्य संमेलनाकडे पाठ

ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?

एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार

“पण मला खात्री आहे की एलजी (मनोज सिन्हा) यांच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारचे विकास आणि कायदा सुव्यवस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे. विक्रमी संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये येत आहेत… सार्वजनिक कल्याणकारी योजनांच्या बाबतीत काश्मीर पहिल्या पाच प्रदेशांमध्ये आहे. मला विश्वास आहे की काश्मीरमधील लोक या बदलाचे स्वागत करतील. मी तेथील सर्व राजकीय पक्षांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करतो.” ते पुढे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा