राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. त्या तीन उमेदवारांचा अर्ज सोमवार, ३० मे रोजी म्हणजेच आज मुंबईमध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी मोदी सरकारला आठ वर्ष पूर्ण झाली म्हणून कौतुक केले आहे. तसेच भाजपा राज्यसभा निवडणुकीसाठी कोणताही घोडेबाजार करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारमध्ये आठ वर्ष पूर्ण केले म्हणून जनतेचे आभार मानले आहेत. तसेच फडणवीसांनी केंद्र सरकारचं अभिनंदन केले आहे. मोदी सरकारं गरिबांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांना भावलं आहे. या आठ वर्षात पंतप्रधान मोदी जगप्रसिद्ध नेते आणि मान्यताप्राप्त नेते बनले आहेत.
हे ही वाचा:
सिद्धू मुसवाला आणि बंदूक कल्चरचा संबंध!
लोनऍप वाल्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
भाजपचा तिसरा उमेदवार, सातवा उमेदवार आल्याने स्पर्धा
पुतीन यांचा मृत्यू? ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेचा दावा
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने तीन उमेदवारांचा अर्ज दाखल केला आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने तीन उमदेवार जाहीर केले आहेत. भाजपाकडून माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे, केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. हे तिन्ही नेते विश्वासू असून राजकारणात या तिघांचे वर्चस्व असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच फडणवीसांनी तिन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्राकडून भाजपाचे तीन उमेदवार हे विचार करून दिले आहेत. भाजपाला कोणताही घोडेबाजार करायचा नाही, असंही फडणवीस म्हणाले आहेत.