भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी

भाजपाचे आवताडे महाविकास आघाडीवर भारी

पोटनिवडणुकीत भालकेंना टाकले मागे

एकीकडे पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांवर देशाचे लक्ष लागून राहिलेले असताना महाराष्ट्रातील पंढरपूरची पोट निवडणूकही जबरदस्त चर्चेचा विषय आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी मुसंडी मारली असून ३५व्या फेरीअंती ते ४३९५ अशा दणदणीत मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यापुढे आहेत. एकूणच तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला एकटा भाजपा भारी पडला असल्याचे चित्र आहे.

निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ

डंका बजने लगा

महाराष्ट्रात आढळले ६३,२८२ कोरोना रुग्ण

रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले?

महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना तूर्तास मागे टाकून आवताडे यानी मोठी आघाडी घेतली आहे. ३५व्या फेरीनंतर आवताडेंच्या खात्यात १ लाख १६०७ मते असून भालकेंकडे ९७२१२ मते आहेत.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, जयंत पाटील यांनी पंढरपुरातील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपानेही झंझावाती प्रचार करून त्याला सडेतोड उत्तर दिले होते. त्यातच महाराष्ट्रातील बदललेली समीकरणे पाहता महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष होते.
भगीरथ भालके यांचे वडील भारत भालके यांचे मध्यंतरी करोनामुळे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात भाजपाने समाधान आवताडेंना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधा राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने भालके यांच्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली.

Exit mobile version