महाराष्ट्राला ५० हजार इंजेक्शन मिळणार
महाराष्ट्रामध्ये सध्या रेमडेसिविर औषधाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. कोविड उपचारांमध्ये रेमडेसिविर औषध मोलाचे असते. त्या औषधाच्या पुरवठ्यासाठी भाजपाचे नेते आमदार प्रविण दरेकर आणि विधान परिषदेचे नेते प्रसाद लाड हे दमण येथे गेले. तेथील एका औषध उत्पादक कंपनीसोबत चर्चा करून त्यांनी राज्यासाठी सुमारे ५० हजार रेमडेसिवीर उपलब्ध करून दिली आहेत.
महाराष्ट्रात रेमडेसिविर औषधाचा जबरदस्त तुटवडा जाणवत आहे. औषधांच्या दुकानांबाहेर रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागल्या होत्या. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी दमण येथे धाव घेतली. तेथील ब्रुक फार्मा या कंपनीशी चर्चा करून, या कंपनीमार्फत राज्याला येत्या चार- पाच दिवसात ५० हजार रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा करून देण्याची व्यवस्था केली आहे.
हे ही वाचा:
दहावी- बारावीच्या परिक्षांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी याच आठवड्यात
लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही- भाजपा
शरद पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी
“केंद्राने या औषधाच्या निर्यातीवर कालपासून बंदी घातली आहे. त्यामुळे हे औषध निर्यात करणारी ब्रुक फार्मा या कंपनीला कोणी काळाबाजार करणाऱ्याने गाठून, गैरफायदा घेऊ नये यासाठी आपण स्वतःच दमणला येऊन या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. शिवाय स्थानिक खासदार लालूभाई पटेल यांचे देखील सहाय्य लाभले.” अशी माहिती प्रविण दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळेला या कंपनीच्या मालकांनी देखील राज्याला लागणारे रेमडेसिवीर रात्रंदिवस काम करून उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचे प्रविण दरेकर यांनी यावेळी सांगितले. आम्ही कृती करून दाखवत आहोत, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कंपनीचे मालक अंशूभाई यांनी देखील याला पुष्टी दिली. सरकारकडून देशांतर्गत वाटपासाठी परवानगी मिळाल्यानंतर तात्काळ ५० हजार इंजेक्शन दिली जाऊ शकतात अशी माहिती देखील त्यांनी दिली. आम्ही तात्काळ कामाला लागू असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले.
यावेळी बोलताना महाराष्ट्र माझा, जिम्मेदारी देवेंद्रजींची या भावनेतून काम करणार असे प्रसाद लाड यांनी यावेळी बोलताना सांगितले. आरोप- प्रत्यारोपांचा खेळ करण्यापेक्षा जर हाच मार्ग सरकारने अवलंबला असता, तर महाराष्ट्राला जास्त लवकर रेमडेसिवीर मिळाले असते. कुठलंही राजकारण न करता प्रविण दरेकरांच्या नेतृत्वाखाली आमचं शिष्टमंडळ आलेलं आहे, आणि कमीत कमी ५० हजार आणि १ लाखापेक्षा जास्त रेमडेसिवीर उपलब्ध करून देऊ. असे प्रसाद लाड यांनी देखील सांगितले.
दरम्यान राज्यात रेमडेसिवीरच्या अनुपलब्धतेवरून ठाकरे सरकारव टिकेची झोड देखील उठवली गेली होती.