ओडिशात भाजप-बिजू जनता दलाची आघाडी?

नवीन पटनायक यांच्यावर टीका न केल्याने चर्चेला उधाण

ओडिशात भाजप-बिजू जनता दलाची आघाडी?

मंगळवारी ओडिशा दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. मात्र नवीन पटनायक यांच्या सरकारबाबत त्यांनी अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि बिजू जनता दलामध्ये आघाडी होणार का, या चर्चेला उधाण आले आहे. मात्र दोन्ही पक्षांच्या वतीने हे दावे फेटाळले जात आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी जाजपूर जिल्ह्यातीतल चंडीखोल येथे ‘मोदी यांची हमी’ या रॅलीला संबोधित केले. या वर्षात मोदी दुसऱ्यांदा ओडिशात दाखल झाले आहेत. त्यांनी आगामी निवडणुकीत विक्रमी विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी लोकांचा उत्साह आणि ऊर्जा पाहून एनडीए लोकसभेत ४००हून अधिक जागा जिंकेल, याचेच संकेत मिळत आहेत, असेही मोदी म्हणाले. मात्र ओडिशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होत असूनही ओडिशाच्या बाबत भाजपच्या भविष्यातील योजना काय आहेत, याबाबत मौन पत्करणेच मोदींनी पसंत केले.

या रॅलीला संबोधित करताना त्यांनी घराणेशाहीवर टीकास्त्र सोडले. ‘जम्मू काश्मीरसह तमिळनाडूपर्यंत जिथे जिथे घराणेशाहीच्या पक्षांची सत्ता आहे, त्या राज्यांचे नुकसान झाले. ती कुटुंब मजबूत झाली, मात्र राज्ये नाहीत,’ असे सांगून ‘अशा घराणेशाहीद्वारे चालवले जाणारे राजकारण चालू ठेवायचे आहे का?,’ असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, एका घराण्याकडून चालवले जाणारे हे पक्ष लाकशाहीविरोधी, प्रतिभाविरोधी आणि युवकविरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘मी घराणेशाहीचा विरोध यासाठी करतो की, ते लोकशाहीसाठी घातक आहे. तरुणांना नवी संधी देत नाही,’ असेही मोदी म्हणाले.

हे ही वाचा :

शेख शाहजहान याला सीबीआयकडे सोपवण्यास प. बंगालचा नकार

२०२३ च्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ

‘मेटा’ ठप्प झाल्यामुळे कंपनीला १०० मिलियन डॉलर्सचं नुकसान

नक्षलवाद्यांशी संबंध प्रकरणात जी एन साईबाबा निर्दोष

काँग्रेसलाही केले लक्ष्य

काँग्रेस पक्ष कधीच तरुणनेत्यांना प्रोत्साहन देत नाही. त्यांचा पक्ष अजूनही ७५ ते ८० वर्षांच्या लोकांची नियुक्ती करतो आहे, असे बोलत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीका केली. तसेच, काँग्रेसने आतापर्यंत ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना पदोन्नती दिली नाही, याकडेही लक्ष वेधले.

Exit mobile version