महाराष्ट्रात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जनतेने भारतीय जनता पार्टीलाच कौल दिला आहे. भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. तर मुख्यमंत्र्यांचा शिवसेना हा पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे. यावरून शिवसेनेला जनतेने नाकारल्याचे दिसून आले आहे.
न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल देत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यात पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूक पार पडल्या. धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या पाच जिल्ह्यांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातील क्रमांक एकचा पक्ष म्हणून पुढे आला आहे.
हे ही वाचा:
तुम्ही माझ्या वडिलांना कधीही मारू शकत नाही
NCB वर निशाणा साधण्यासाठी नबाब मलिकना ड्रग्ज माफीयांनी सुपारी दिली आहे काय?
‘शीख हत्यांकाडास जबाबदार असणाऱ्यांची सहानुभूती नको!’
जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांपैकी २३ जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येकी १७ ठिकाणी विजय मिळाला आहे. तर शिवसेना १२ ठिकाणी विजयी झाली आहे. तर पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत १४४ जागांपैकी भारतीय जनता पार्टीला ३३ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस पक्षाला ३५ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना २२ ठिकाणी निवडून आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १६ जागांवर यश मिळाले आहे.
या निकालाविषयी प्रतिक्रिया देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले आहे की या निकालाचा तपशील पाहिला तर सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिळून एकूण २५ टक्के जागा या भाजपला मिळाल्या आहेत. २५ टक्के जागांवर अपक्ष आणि छोट्या पक्षांनी विजय मिळवला आहे. तर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष हे ५० टक्के जागांवर आटोपले आहेत. भारतीय जनता पार्टी या निवडणुकांमध्ये क्रमांक १ चा पक्ष म्हणून विजयी झाला आहे. त्यासाठी फडणवीस यांनी मतदारांचे आभार सुद्धा मानले आहेत. तर सर्व पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.