उत्तर प्रदेशात ‘चप्पा चप्पा भाजपा’…ब्लॉक अध्यक्ष निवडणुकीत घवघवीत विजय

उत्तर प्रदेशात ‘चप्पा चप्पा भाजपा’…ब्लॉक अध्यक्ष निवडणुकीत घवघवीत विजय

उत्तर प्रदेशमधील ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुकणांमध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीचा बोलबाला दिसून आला आहे. शनिवार, १० जुलै रोजी पार पडलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील ब्लॉक प्रमुखांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. भाजपाने ८२५ पैकी ६४० जागा जिंकल्या आहेत. तर समाजवादी पार्टी, काँग्रेस, बहुजन समाज पार्टीसारख्या इतर सर्व पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.

भारतीय जनता पार्टीचा हा विजय आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. अवघ्या काही महिन्यांवर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने अशाच प्रकारचे यश मिळवले होते. तर त्यानंतर आता ब्लॉक अध्यक्षांच्या निवडणुकीत पक्षाचा झालेला उदय ही सकारात्मक बाब मानली जात असून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी आहे.

हे ही वाचा:

नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू

ओबीसी इम्पिरिकल डेटाचे सर्वेक्षण करणार ‘कलेक्टर’; मग केंद्र काय करणार?

बैलगाडीलाही पेलवेना काँग्रेसचा भार

‘टीका वाली नाव’…बिहारमधले अनोखे लसीकरण केंद्र

या विजयाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया देताना भाजपाला जिल्हा पंचायत आणि क्षेत्र पंचायत मध्ये ८५ टक्के जागांवर लोकांचे समर्थन प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कार्याला पक्ष संघटनेच्या माध्यमातून राज्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सबका साथ सबका विश्वास या हेतूनेच कार्य केल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

तर पक्षाच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर प्रदेश भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या जनहिताच्या योजनांनी जनतेला लाभ मिळाला आहे. तोच पक्षाच्या यशात परावर्तित झाला आहे.

Exit mobile version