23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणआता उरल्या सुरल्या पक्षाला काय 'पेंग्विन पक्ष' म्हणायचं का?

आता उरल्या सुरल्या पक्षाला काय ‘पेंग्विन पक्ष’ म्हणायचं का?

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी शिवसेनेला फटकारले आहे

Google News Follow

Related

भाजपा आणि शिवसेनेतील वाद आता शिगेला पोहचला आहे. शिवसेनेने भाजपाचा कमळाबाई असा उल्लेख केला आहे. त्यावरून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र लिहत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्या आता उरल्या सुरल्या पक्षला काय पेंग्विन पक्ष म्हणायचं का? असा सवालचं आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय हरकत नाही. मात्र, बाईमध्ये आई, ताई आणि कडक लक्ष्मी पण आहे. त्यामुळे तुमच्यातल्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही ‘पेंग्विन सेना’ म्हणायचं का? असा सवलाचं शेलारांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेले ‘सामना’ या वृत्तपत्रात भाजपावर कमळाबाई अशी टीका करण्यात आली होती. त्यावरून थेट सामनाचे संपादक उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत शेलारांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे. असे कडक अस्सल शब्दही आमच्याकडे असल्याचेही शेलार म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

राज्यपाल नियुक्त आमदारांची ‘ती’ यादी घेतली मागे

पाकिस्तानात पुराचा हाहाकार सुरूच, तीन कोटी लोकांचे जनजीवन विस्कळीत

‘भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत’

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘विविधतेत एकता’ उत्सव

सामनामध्ये प्रकाशित झालेल्या आजच्या अग्रलेखात सरकारवर विविध मुद्यांवर टीका करण्यात आली आहे. ही टीका करताना शिवसेनेकडून भाजपला कमळाबाई असं हिणवण्यात आलं आहे. पूर्वीपासून शिवसेनेतील अनेक नेते भाजपाला कमळाबाई म्हणून हिणवत आले आहेत. मात्र, आजच्या सामनातील अग्रलेखातील कमळाबाईच्या उल्लेखाला आशिष शेलारांनी उत्तर दिलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा