भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी पक्षाच्या राज्य प्रभारींच्या नावांची घोषणा केली. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विविध राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. नवीन नियुक्तीनुसार विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशात सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. याबाबत पत्रक भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनाही यात संधी मिळाली आहे. त्यांच्याकडे केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे २०२०मध्ये राष्ट्रीय सचिव नंतर मध्य प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांच्यावर पुन्हा मध्य प्रदेशात सहप्रभारीची जबाबदारी साेपवण्यात आली आहे. विनोद तावडे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली अाहे. त्यांच्यावर हरियाणानंतर बिहारची जबाबदारी देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदही देण्यात आलेले आहे.
नवनियुक्त प्रभारींमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि बिप्लब कुमार देब यांच्याशिवाय माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि महेश शर्मा यांचा समावेश आहे. जावडेकर केरळमधील पक्षाचे काम पाहतील . भाजपने एका निवेदनात म्हटले आहे की पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक बनवण्यात आले आहे, तर पक्षाचे राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा हे संयुक्त समन्वयक असतील. सध्या कोणतेही संघटनात्मक पद न भूषविलेल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्याने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण असल्याचं निवेदनात म्हटलं आहे.
भाजपने सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहारचे नवे प्रभारी आणि बिहारचे माजी मंत्री मंगल पांडे यांना पश्चिम बंगालचे प्रभारी केले आहे. रुपाणी पंजाब आणि चंदीगडचे प्रभारी असतील. तर देब हरियाणाचे प्रभारी असतील. विधानानुसार, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य ओम माथूर हे छत्तीसगडचे प्रभारी असतील. पक्षाच्या उत्तर प्रदेश युनिटचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी हे झारखंडमधील पक्षाचे काम पाहतील. महेश शर्मा यांच्याकडे त्रिपुराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचवेळी पी मुरलीधर राव यांना मध्य प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. तर पंकजा मुंडे आणि रमाशंकर कथेरिया यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे
वणीच्या सप्तशृंगी मातेचे का दिसते आहे हे वेगळे रूप?
राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा
याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?
काेणाला काेणती जबाबदारी
राज्य प्रभारी सह-प्रभारी
बिहार: विनोद तावडे, हरीश द्विवेदी (खासदार)
छत्तीसगड: ओम माथूर,नितीन नबिन (आमदार)
दमण दीव आणि दादरा आणि नगर हवेली : विनोद सोनकर, खासदार
हरियाणा: बिप्लब कुमार देब
झारखंड : लक्ष्मीकांत बाजपेयी, खासदार
केरळ : प्रकाश जावडेकर, खासदार डॉ.राधामोहन अग्रवाल,
लक्षद्वीप : डॉ.राधामोहन अग्रवाल, खासदार
मध्य प्रदेश: पी. मुरलीधर राव पंकजा मुंडे, राम शंकर कथेरिया,
पंजाब: विजयभाई रुपाणी, आमदार नरिंदर सिंह रैना
तेलंगणा: तरुण चुघ अरविंद मेनन
चंदीगड : विजयभाई रुपाणी, आमदार
राजस्थान : अरुण सिंह, खासदार विजय रहाटकर
त्रिपुरा : महेश शर्मा, खासदार
पश्चिम बंगाल: मंगल पांडे, आमदार अमित मालवीय, आशा लाक्रा
ईशान्य राज्यः संबित पात्रा, समन्वयक ऋतुरत सिन्हा, संयुक्त समन्वयक