महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाची दक्षता समिती

महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाची दक्षता समिती

महाराष्ट्रातील गड किल्ले हा कायमच राज्यासाठी गौरवाचा, प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा विषय राहिला आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये या गडकिल्ल्यांवर अनधिकृत पद्धतीने बांधकाम करून विशिष्ट धर्माची प्रार्थना स्थळ उभारण्याचा प्रकार घडताना आढळून आला आहे. तर काही ठिकाणी उरूस भरवण्याचे घाट घातल्याचेही निदर्शनास आले. या सर्व प्रकरणात राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीतर्फे मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला. तर आता या गड किल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाने एक दक्षता समितीची स्थापना केली आहे.

मंगळवार, १८ जानेवारी रोजी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी या समितीची घोषणा केली. या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ‘नोव्हेंबर २०१९ मध्ये ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू झाला आहे’ अशी टीका भाजपाने केली आहे. तर गड-किल्ल्यांचे पवित्र्य नष्ट करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती स्थापन करण्यात आल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

कोविड विरोधी लसीकरणात भारताने ओलांडला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा

मुलायम परिवारातही आता भा’जप’

लंडनच्या आलिशान घरातून विजय मल्ल्याला काढणार बाहेर

पर्यटन बंद झाले आणि थायलंडमध्ये माकडांनी शहरांत घातला धुमाकूळ

ही समिती राज्यातील गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल आणि नंतर संपूर्ण पक्ष जनजागृती करून या गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करेल.

खासदार रणजितसिंह निंबाळकर हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. तर एकूण चार सदस्य या समितीत असतील. ज्यामधे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, विक्रम पावस्कर (भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष) सौ. वर्षा डहाळे (भाजपा महिला मोर्चा प्रदेश चिटणीस) नितीनराजे शिंदे (माजी आमदार, सांगली) असे या समितीचे सदस्य आहेत. तर भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर हे या समितीचे मार्गदर्शक असणार आहेत.

Exit mobile version