भारतीय जनता पार्टीने माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे, केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यांनतर तिसऱ्या जागेसाठी भाजपा कोणता उमेदवार देणार याची चर्चा सुरु होती. मात्र आता त्या चर्चेला विराम मिळाला आहे. भाजपाने आपला तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. भाजपाने कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक यांना तिसऱ्या जागेसाठी तिकीट जाहीर केलं आहे.
भाजपाकडून राज्यसभेसाठी रविवार, २९ मे रोजी उमेदवारांच्या दोन यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत भाजपाकडून पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनतर तिसऱ्या जागेसाठी भाजपा कोणाला उमेदवारी देईल ही चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. अखेर भाजपाकडून तिसरी जागा कोण लढवणार हे काल उशिरा भाजपाने जाहीर केले.
तिसऱ्या जागेसाठी भाजपाचे विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा रंगली होती. पण कोल्हापूरमध्ये शिवसेनेला शह देण्यासाठी धनंजय महाडिक मैदानात उतरले आहे. तिसऱ्या जागेसाठी सोमवार, ३० मे रोजी म्हणजे आज धनंजय महाडिक उमेदवारी अर्ज भरणार आहे.
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति ने विभिन्न राज्यों में होने वाले आगामी राज्य सभा द्विवार्षिक चुनाव 2022 के लिए निम्नलिखित नामों पर अपनी स्वीकृति प्रदान की है। pic.twitter.com/LUBrhkXGHN
— BJP (@BJP4India) May 29, 2022
हे ही वाचा:
पुतीन यांचा मृत्यू? ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेचा दावा
नेपाळमधील त्या बेपत्ता विमानात ठाण्याचे चार प्रवासी
पदर्पणाच्या हंगामतच गुजरात टायटन्सने आयपीएलच्या विजेतेपदावर कोरलं नाव
शहीद प्रशांत जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार; विधवा प्रथेला मूठमाती
दरम्यान, भाजपाने मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना उमेदवारी दिली आहे. तर कर्नाटकमधून निर्मला सीतारामन आणि जगेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राजस्थानमधून घनश्याम तिवारी , युपीमधून सुरेंद्र सिंह नागर, बाबुराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांना उमेदवारी दिली आहे. उत्तराखंडमधून डॉ. कल्पना सैनी आणि बिहारमधून सतीश दुबे आणि शंभू पटेल यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.