राज्यातील सरकार गद्दारांचे नसून खुद्दारांचे

आगामी निवडणुकांसाठी 'महाविजय २०२४ ' अभियानाची घोषणा

राज्यातील सरकार गद्दारांचे नसून खुद्दारांचे

आज जे सरकार राज्यात स्थापन झाले ते गद्दारांचे नसून खुद्दारांचे आहे. २०१९ साली लोकांनी दिलेल्या मतांचे अवमान करून गद्दारी करून, पाठीमागे खंजीर खुपसून राज्यात मविआ सरकार स्थापन झाले होते. त्या गद्दारातून खुद्दार बाहेर पडले असून, आता हे खुद्दारांचे सरकार आहे अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली . नाशिकमध्ये झालेल्या भाजप कार्यकारिणीची बैठकीत बोलतांना फडणवीस यांनी ही टीका केली.

या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी ‘महाविजय २०२४ ‘ मोहिमेची घोषणा करण्यात आली . या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्याचा भाजपचा निर्धार असून लोकसभेसाठी ‘मिशन ४५’ आणि विधानसभेसाठी ‘मिशन २००’ अभियानाची घोषणा करून राज्यात १०० टक्के भाजपचा नारा देण्यात आला . विशेष म्हणजे भाजपने या ‘महाविजय २०२४’ ठरावाची जबाबदारी विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

उप मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की , अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होते, हे सर्वांनी पाहिले, पण या सरकारमुळे महाराष्ट्राची अडीच वर्ष वाया गेलेली आहेत. अडीच वर्षात सर्वसामान्यांच्या आयुष्यात ते परिवर्तन होऊ शकत होतं, ते परिवर्तन करण्याची ज्यांना संधी मिळाली त्यांनी ती घालवली आहे. त्यांनी फक्त स्वत:च्या जीवनात काय परिवर्तन करता येईल यासाठी प्रयत्न केलेत.

हे ही वाचा:

रमेश बैस नवे राज्यपाल.. कोश्यारींचा राजीनामा मंजूर

महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उदघाटन

कन्याकुमारी नंतर कर्नाटकात भारतमातेचे दुसरे सर्वात मोठे मंदिर

राजमौलींचा RRR स्पीलबर्गना वाटला भन्नाट

दोन कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प
राज्यातील निवडून आलेले मंत्री, खासदार, आमदार अशा २०० पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपच्या भावी रणनीतीवर मंथन या बैठकीत झाले. राज्यातील भाजपच्या विस्तारावर विचारमंथन केल्यानंतर राज्यातील दोन कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करण्यात आला. बैठकीतील राजकीय प्रस्तावानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आगामी काळात विधानसभेसाठी २०० आमदार निवडून आणण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अनुमोदन दिले

२०-२० ची मॅच विकासासंदर्भात खेळायची
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले असून, येत्या अडीच वर्षात आपल्याला पाच वर्षाचं काम करायचें आहे, म्हणजेच २०-२० ची मॅच आपल्याला विकासासंदर्भात खेळायची आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही मिळवून ही मॅच सुरू केली असून बॅटिंग सुरू झालेली आहे आणि २०२४ निवडणूक जिंकवूनच आम्ही ही बॅटिंग संपवणार आहे , असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला

Exit mobile version