टिपू विरोधात आंदोलन टिपेला

टिपू विरोधात आंदोलन टिपेला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सध्या टिपू सुलतानच्या नावाचा उदो उदो सुरु आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील मंत्री अस्लम शेख यांनी मालाडमधील एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून महाराष्ट्रात नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात टिपूचे गोडवे गायची गरज काय? असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी मालाड मधील मालवणी भागात होऊ घातलेल्या एका उद्यानाला टिपू सुलतानचे नाव दिले आहे. यावरून भाजपाचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. बुधवार, २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी मालाड येथील या उद्यानाच्या बाहेर हजारोंच्या संख्येने हे कार्यकर्ते जमले असून मंत्री अस्लम शेख यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली.

हे ही वाचा:

राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे

…आणि ‘विराट’ निवृत्त झाला

प्रजासत्ताक दिनाच्या गुगलकडून भारतीयांना खास शुभेच्छा

राजपथावर पंतप्रधान मोदींच्या लूकची चर्चा

यावेळी महाराष्ट्रद्रोही टिपू सुलतानचे नाव महाराष्ट्रात हवेच कशाला असा सवाल आंदोलकांनी केला. तर महाराष्ट्रातल्या उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप अशा वीरांचीच नावे देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या आंदोलनामुळे मालाड मधील मालवणी परिसरात वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली.

या आंदोलनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता. तर यावेळी निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी मोठया प्रमाणावर धरपकड करण्यात आली आहे. तरी देखील मालवणीतील परिस्थिती नियतंत्रणात येताना दिसत नाहीये.

Exit mobile version