भाजपाची राजस्थानात मुसंडी, मध्य प्रदेशातही संपूर्ण बहुमताकडे

तेलंगणात मात्र बीआरएस काँग्रेसच्या मागे

भाजपाची राजस्थानात मुसंडी, मध्य प्रदेशातही संपूर्ण बहुमताकडे

रविवारी चार राज्यांच्या निवडणुकांचे कल भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण करणारे ठरले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान या दोन मोठ्या आणि प्रमुख राज्यात भाजपाने संपूर्ण बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून छत्तीसगडमध्येही भाजपाने दमदार कामगिरी केली आहे. अर्थात तिथे काँग्रेससह त्यांची सत्ता मिळविण्यासाठी चुरस सुरू आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस आणि बीआरएस यांच्यात चढाओढ असताना काँग्रेसने भारत राष्ट्र समिती या केसीआर यांच्या पक्षाला मागे टाकले आहे. त्यामुळे एकूणच हे सगळे कल भाजपासाठी आनंददायी ठरले आहेत. एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला यश मिळेल असे संकेत दिले जात होते, मात्र ते सगळे मागे पडले आहेत.

सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानात भाजपाने प्रारंभापासूनच आघाडी ठेवली आणि नंतर बहुमताच्या दिशेने वाटचालही केली. बातमी करत असताना मध्य प्रदेशात भाजपाच्या पारड्यात १४० पर्यंत जागा पडतील अशी शक्यता आहे तर काँग्रेसला ९०च्या आसपास जागा दाखवत होत्या. छत्तीसगडमध्ये भाजपा आणि काँग्रेस पक्ष हे ४५-४५ अशा स्थितीत आहेत. तिथे कधी भाजपा ४७ तर काँग्रेस ४४ तर कधी काँग्रेस ४७ तर भाजपा ४५ अशी स्थिती पाहायला मिळते आहे. प्रत्यक्ष निकाल जाहीर होतील तेव्हा कुणाला यश मिळेल हे पाहावे लागेल. पण भाजपाने छत्तीसगडमध्ये काँग्रेसला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हे ही वाचा:

‘आप’चे संजय सिंग यांच्यावर ईडीचे आरोपपत्र

तमिळनाडूत २० लाखांची लाच घेताना ईडी अधिकाऱ्याला अटक

रिंकूनंतर अक्षरची कमाल; भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका जिंकली

आरिफ बनला वीर… हिंदू मुलीवर बलात्कार, धर्मांतर, गर्भपात

तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसने भारत राष्ट्र समितीला पछाडले आहे. तिथे जाहीर झालेले कल दाखवत आहेत की, काँग्रेसच्या खात्यात ६९ जागा आहेत तर बीआरएसला ३७ जागांवर आघाडी मिळाली आहे.

मध्य प्रदेशमध्ये २३० जागांसाठी मतमोजणी सुरू झाली त्यातील २१५ जागा जिंकणारा पक्ष बहुमत मिळविणार आहे. तर छत्तीसगडमध्ये ९० जागांपैकी ४६ जागा जिंकणारा पक्ष बहुमत घेणार आहे. राजस्थानात १९९ जागांपैकी १०० पेक्षा अधिक जागा जिंकणारा पक्ष बहुमत मिळविणारा आहे.

 

Exit mobile version