पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे तृणमूल काँग्रेस सरकार कोळसा घोटाळ्यात सहभागी होते असा थेट आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी याला कोळसा घोटाळ्यातील ९०० कोटी रुपये दिले गेल्याचा खळबळजनक दावाही अधिकारी यांनी केला. रविवारी प्रत्रकार परिषद घेत अधिकारी यांनी हा आरोप केला.
शनिवारी रात्री ईडीने कारवाई करत बेकायदेशीर कोळसा खाणकाम आणि कोळसा तस्करी या प्रकरणात महत्वपूर्ण कारवाई केली. या कारवाईत पश्चिम बंगालमधील बंकूडा पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक अशोक मिश्रा याला अटक करण्यात आली. अशोक मिश्रा हा कोळसा घोटाळ्यातील फारार आरोपी आणि तृणमूल पक्षाचा नेता असलेल्या विनय मिश्रा याचा नातेवाईक आहे.
हे ही वाचा:
मुंबईत लॉकडाऊन लावण्याची शक्यता नाही- किशोरी पेडणेकर
नक्षली हल्ल्यात वीस जवान हुतात्मा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी बोलावली उच्च स्तरीय बैठक
लसीकरणाला प्रोत्सहन देणारे अनोखे उपाय
या प्रकरणात विनयचा एक भाऊ प्रकाश याला या पूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अनुप माजीची सीबीआय द्वारे कसून चौकशी केली जात आहे. शनिवारी सीबीआय मार्फत अनुपची सात तास चौकशी करण्यात आली. या आधीही दोन वेळा अनुपची चौकशी करण्यात आली आहे.
एकीकडे पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना काही प्रसार माध्यमांच्या हाती कोळसा घोटाळ्याशी संबंधित महत्वपूर्ण अशा ध्वनिफिती लागल्या. या ध्वनिफितींमधला आवाज हा कोळसा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या अनुप माजी याचा निकटवर्तीय गणेश बागरियाचा असल्याचा दावा केला जात आहे. या ध्वनिफीतीत कशाप्रक्रारे कोळसा घोटाळ्यातील हिस्सा ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक यांच्यापर्यंत पोहोचवला जायचा याची पोलखोल करण्यात आली आहे. याच ध्वनिफितींच्या आधारे भारतीय जनता पार्टीकडून तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
LIVE: Joint Press Conference by Shri @SuvenduWB, Shri @amitmalviya, Shri @DinTri and Shri @jay_majumdar in West Bengal. https://t.co/lxLooUNpv6
— BJP (@BJP4India) April 4, 2021