पत्राचाळजवळ काय होणार? भाजपाचे पोलखोल आंदोलन संध्याकाळी

पत्राचाळजवळ काय होणार? भाजपाचे पोलखोल आंदोलन संध्याकाळी

महाविकास आघाडी सरकारच्या वसुलीखोरीची व गेल्या २५ वर्षात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रविवारी संध्याकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. /e

वादग्रस्त पत्राचाळ असलेल्या गोरेगाव विधानसभेत वॉर्ड क्रमांक ५८ मध्ये १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पोलखोल सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या सभेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा,महापालिका निवडणूक समितीचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार,विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर,मुंबई भारतीय जनता पार्टीचे प्रभारी/आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाल शेट्टी, खासदार पुनम महाजन, खासदार मनोज कोटक, आमदार अमित साटम,स्थानिक आमदार विद्या ठाकुर व मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनाही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

जेम्स लेन म्हणतो, मी बाबासाहेब पुरंदरेंशी कधीही बोललो नाही!

शरद पवारांचा खोटारडेपणा उघड; तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांवर कारवाई होणार का?

‘राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा’

राज ठाकरे ५ जूनला जाणार अयोध्येला; मुस्लिमांनाही भोंग्याचा त्रास

 

या सभेला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. मात्र ही सभा घेऊन पोलखोल करण्याचा निश्चय भाजपाने केला आहे. ही सभा सिद्धार्थ नगर रस्ता क्रमांक ११,प्रबोधन क्रीडाभवनाजवळ,तातू हॉटेलच्या बाजूला, गोरेगाव (प) येथे होणार आहे.

संतोष मेढेकर, जिल्हाअध्यक्ष, उत्तर पश्चिम जिल्हा, संदीप पटेल, मा.नगरसेवक, विजय गायकवाड, अध्यक्ष,गोरेगाव भाजपा, सुनिल चव्हाण, वॉर्ड अध्यक्ष,वॉर्ड क्र.५८ यांनी ही माहिती दिली आहे.

Exit mobile version