30 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरराजकारणस्थायी समितीत कोणत्याही चर्चेविना ६ हजार कोटींचे ३७० प्रस्ताव मंजूर; भाजपाचे आंदोलन

स्थायी समितीत कोणत्याही चर्चेविना ६ हजार कोटींचे ३७० प्रस्ताव मंजूर; भाजपाचे आंदोलन

Google News Follow

Related

पालिका निवडणुकीत सत्ता उलथवणार; भाजपाचा इशारा

मुंबई महापालिका स्थायी समितीत शेवटच्या सभेत शिवसेनेने ६ हजार कोटींचे ३७० प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना, विरोधकांना बोलू न देता मंजूर केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी ‘जागो आयुक्त प्यारे’, ‘भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा’, ‘भ्रष्टाचाराला आळा घाला’, ‘करदात्या मुंबईकरांच्या पैश्याची उधळपट्टी थांबवा’, ‘मुंबईकरांना सुसह्य जीवन द्या’, ‘यशवंत जाधवांवर कारवाई करा’ अशा जोरदार घोषणा देत आयुक्तांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. स्थायी समितीत आलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी होत्या. त्यात स्पष्टता नव्हती.

याबाबत कुठलीही चर्चा करण्यास अध्यक्षांनी परवानगी दिली नाही. काही प्रस्ताव आदल्या रात्री आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार आहे. त्यामुळे असे प्रस्ताव मंजूर न करता आयुक्तांनी एक जबाबदार प्रशासक म्हणून पालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली. गेली तीस वर्षे मुंबईकरांना खोटी आश्वासने देऊन फसवणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला आगामी निवडणुकीत जनताच धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देत भाजपा गटनेते शिंदे यांनी दंड थोपटून शिवसेनेला आव्हान दिले.

सत्ताधारी शिवसेनेने सर्वसामान्य मुंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. मुंबई महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार पहायला मिळतो आहे तो देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला नसेल; इतकी भयावह परिस्थिती आज पालिकेत पाहायला मिळते. आयुक्तांना हाताशी धरून पालिकेत प्रेतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याइतपत शिवसेनेची मजल गेली आहे, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला.

स्थायी समितीत आलेले अनेक प्रस्ताव आदल्या रात्री आले होते. त्यामुळे तीन स्पष्ट दिवस झाले नसल्याने महापालिका कार्यपद्धती नियम व विनियम पृष्ठ क्र.६१ वरील स्थायी समितीच्या कार्यपद्धतीसंबंधी नियम व स्थायी समितीचे कामकाज चालविण्यासंबंधी विनिमय मधील नियम १  प्रमाणे सदस्याने हरकत घेतल्यावर तो प्रस्ताव मंजूर करता येत नाही. परंतु स्थायी समिती अध्यक्षांनी दादागिरीने महापालिका नियम पायदळी तुडवत, लोकशाहीचा गळा घोटत, रेटून सर्व प्रस्ताव मंजूर केले.  केवळ कंत्राटदारांच्या दलालीसाठी केलेले स्थायी समिती अध्यक्षांचे हे वर्तन लोकशाहीला काळीमा फासणारे आहे अशी घणाघाती टीका गटनेते शिंदे यांनी केली.

हे ही वाचा:

जागतिक महिला दिनी महिला पोलीस अंमलदारांना मिळाली मोठी ‘भेट’

तब्बल ३८ वर्षांनंतर प्रशासकाकडे मुंबई महापालिकेचा पदभार

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी काय बोलले नरेंद्र मोदी

निवडणूक आयोगाचे काही अधिकार मिळणार राज्य सरकारला

 

महापालिकेत प्रशासक म्हणून आयुक्तांची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल तपासणी करून या भ्रष्टाचाराला आळा, पायबंद घालण्यासाठी आणि सामान्य करदात्या
मुंबईकरांना न्याय देण्यासाठी भ्रष्टाचारी स्थायी समिती अध्यक्षांवर कठोर कारवाई करावी अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
201,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा