राज्यातील निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बिटकॉइनच्या रूपात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदानाच्या आदल्या रात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांच्यासह नाना पटोलेंचं नाव घेत काही ऑडिओ क्लिपचा संदर्भ दिला आहे. सुप्रिया सुळे या ऑडिओ क्लिपमध्ये बिटकॉईनचे व्यवहार करून निवडणुकांसाठी निधी जमा करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात आता ईडीने कारवाई केली आहे.
या प्रकरणातील कॉल रेकॉर्डिंग्स आणि काही चॅट्सचे स्क्रीनशॉट समोर आले होते. सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या कथित आवाजातील ऑडिओ क्लिपही समोर आली होती. सुप्रिया सुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ज्या गौरव मेहताचा उल्लेख आहे त्याच्या रायपुर मधील घरी ईडीने धाड टाकली आहे. २०१८ साली झालेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी धाड टाकल्याचे सांगण्यात आले. गौरव मेहता हा एका ऑडिट फर्मचा कन्सलटन्ट असून पुणे पोलीस ६,६०० कोटींच्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी त्याची चौकशी करणार आहेत.
The Enforcement Directorate is conducting raids at the premises of Gaurav Mehta (employee of an audit firm named Sarathi Associates) in connection with an alleged Bitcoin scam. The searches are being carried out in Raipur, Chhattisgarh.
— ANI (@ANI) November 20, 2024
विदेशी चलनाचा वापर करून सुप्रिया सुळे आणि नाना पटोले हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी सुधांशु त्रिवेदी यांनी केली आहे. सुधांशू त्रिवेदी यांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवल्या आणि काही चॅटिंग दाखवत पैसे दिले जात असल्याचा आरोप केला. त्रिवेदी म्हणाले की, या क्लिपमधील आवाज तुमचा आहे की नाही, असा सवालही सुधांशू त्रिवेदी यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांना केला. ओडिओ क्लिपमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा आवाज ऐकू येत असून त्या म्हणत आहेत की, “बिटकॉईन ऐवजी रोख पाहिजे. तुम्हाला कोणत्याही तपासाची काळजी करण्याची गरज नाही, तपास आलाच तर आमचे सरकार ते हाताळेल.”
हे ही वाचा:
संभलची जामा मशीद हरिहर मंदिर असल्याचा दावा; न्यायालयाने दिले सर्वेक्षणाचे आदेश
डोमिनिकानंतर गयाना आणि बार्बाडोसकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान जाहीर!
बिटकॉइन्समध्ये व्यवहार केला आहे का? भाजपाचा सुप्रिया सुळे, नाना पटोलेंना सवाल
विधानसभा २०२४: नेत्यांसह, खेळाडू आणि कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
दरम्यान, सुधांशू त्रिवेदींचे आरोप निराधार आहेत. निवडणुकीच्या आदल्या रात्री खोटी माहिती पसरवली जात आहे. जनतेची फसवणूक करण्यासाठी खोटे आरोप केल्याबद्दल त्यांना कायदेशीर नोटीस देणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.