मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….

मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील अति महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी सुरू केलेल्या आणि राबवलेल्या अभिनव योजनांचे, विकास कामांचे अनेकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरून कौतुक होताना दिसते. मोदींच्या नेतृत्वात भारत सरकारने सुरू केलेल्या अशाच एका क्रांतिकारी योजनेने मायक्रोसॉफ्टचे निर्माते बिल गेट्स हे भारावून गेले आहेत.

ही योजना म्हणजे ‘आयुषमान भारत डिजीटल मिशन’. २७ सप्टेंबर रोजी भारतात या योजनेची सुरूवात झाली. ज्याअंतर्गत नागरिकांना आरोग्य विषयक ओळखपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. या ओळखपत्रामध्ये लोकांच्या आरोग्य विषयक नोंदी असतील. भारत सरकारने सुरू केलेली ही नवी योजना आरोग्य क्षेत्रातील मोठी क्रांती मानली जात आहे.

भारताच्या याच नव्या योजनेने दस्तुरखुद्द बिल गेट्स हे भारावून गेले आहेत. त्यांनी या योजनेचे कौतूक केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करताना गेट्स म्हणतात, ‘ही डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा न्याय्य, सुलभ आरोग्यसेवा वितरण सुनिश्चित करण्यात आणि भारताच्या आरोग्यविषयक प्रगतीच्या उद्दीष्टाला गती देण्यास मदत करेल.’

हे ही वाचा:

लक्ष्मी येणार सोन्याच्या बिस्किटावरून!

‘आम्ही जी-२३ आहोत, जी हुजूर २३ नाही’

कोण आहेत फुमियो किशिदा?

अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून गेट्स यांचे आभार मानले आहेत. ‘आयुष्मान भारत अभियानाचे कौतुक केल्याबद्दल आपले धन्यवाद बिल गेट्स जी. भारतात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास भरपूर वाव असून भारत त्या दिशेने प्रचंड परिश्रम करत आहे.’ असे मोदींनी म्हटले आहे

Exit mobile version