बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप आला असून बिहार सरकारमधील भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि जनता दल (संयुक्त) यांच्यातील युती संपुष्टात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. नितीश कुमार यांनी आज सर्व खासदार आणि आमदारांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांनी घोषणा केली.
बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्यानंतर युती तुटणार असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला आहे. भाजपासोबत युती तोडण्यापूर्वी नितीश कुमार यांनी आपल्या सर्व आमदारांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
हे ही वाचा:
संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे चित्रा वाघ संतापल्या
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा
शिंदे फडणवीस सरकारमध्ये १८ कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ
ऐका, राऊतप्रकरणी पवारांच्या मौनाचे कारण…
नुकत्याच पार पडलेल्या नीति आयोगाच्या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित होते. त्यामुळे नितीश कुमार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा होत्या. दुसरीकडे, विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलानेही तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आमदारांची बैठक बोलावली आहे. नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर त्यांच्याशी आघाडीची तयारी राष्ट्रीय जनता दलाने दाखवल्याची माहिती आहे.