मुंबईतील मालवणीत हिंदूंना मोठे यश

मुंबईतील मालवणीत हिंदूंना मोठे यश

मुंबईच्या मालवणी भागात मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आले आहेत. या भोंग्यांच्या माध्यमातून या परिसरातील दलित हिंदू कुटुंबांना धमकण्यात येत होते. भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, भाजपा आमदार नितेश राणे यांनी या काळात हिंदू कुटुंबांच्या बाजूने लढा देत दलित हिंदू कुटुंबांना मदत केल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वीही मालवणीमध्ये असे अनेक प्रकार बघायला मिळाले आहे. ज्यावेळी मुस्लिम समाजाकडून हिंदूंना त्रास दिला जात होता. मालवणीत हिंदू कुटुंबांवर होत असलेला अन्याय आणि त्यांना तिथून हुसकावून लावण्यासाठी येत असलेला दबाव याविरोधात सातत्याने आवाज उठविणारे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी धर्मरक्षाबंधनाची हाक देत तेथील समस्त हिंदुंना या मालवणी पॅटर्नविरोधात उभे राहण्याचे आवाहन केले. आता अत्याचार, दुराचार सहन केला जाणार नाही. मालवणी पॅटर्नची मुंबईत पुनरावृत्ती होऊ देणार नाही, अशी घोषणा आमदार लोढा यांनी केली.

हे ही वाचा:

गोल्डन बाॅय नीरज पुन्हा मैदानावर

आर्यन खानचा ३० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगवास निश्चित

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात मालवणीतील हिंदू महिलांचे तसेच हिंदू बांधवांचे विशेष आभार मानले. तुमच्यामुळेच मालवणी पॅटर्नविरोधात आवाज उठविला गेला आहे, असे सांगत मालवणी पॅटर्नला रोखण्याचे काम आपण केलेत आणि यापुढेही करत राहाल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्या हिंदू भगिनींनी या मालवणी पॅटर्नला विरोध करण्याची हिंमत दाखविली त्याला मी वंदन करतो, असेही आमदार लोढा म्हणाले.

हा भारत आहे. ही धर्मशाळा नाही. इथे बांगलादेशी येणार, रोहिंग्या येणार आणि वस्ती करणार. नंतर आपल्याच लोकांना बाहेर हुसकावून लावणार हे यापुढे चालणार नाही. हिंदू आता जागृत झाले आहेत, असे आमदार लोढा म्हणाले.

Exit mobile version