विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील पक्ष, गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP), जो २०२२ च्या गोवा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करत आहे, त्यांनी गुरुवारी आमदार जयेश साळगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांनी भाजपामध्ये सामील होण्याच्या दाव्यांना का फेटाळले नाही? असा सवाल करत त्यांना ही नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्या भाजपा प्रवेशाचीही सर्वत्र चर्चा आहे.
विधानसभेतील GFP च्या तीन आमदारांपैकी एक असलेले जयेश साळगावकर हे मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटण्यासाठी पक्षप्रमुख विजय सरदेसाई आणि आमदार विनोदा पलीनकर यांच्यासोबत दिल्लीला गेले नाहीत. या भेटीनंतरच सरदेसाई यांनी काँग्रेससोबत युती करण्याची योजना जाहीर केली.
भाजपच्या एका आमदाराने त्यांचे नाव न घेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केल्याने GFPने कारणे दाखवा साळगावकरांना नोटीस बजावली होती.
“पणजीचे भाजपा आमदार (अतानासिओ मोन्सेरेट) यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट टिपणी केली की, राहुल गांधींना भेटण्यासाठी दिल्ली दौऱ्यादरम्यान अनुपस्थित असलेल्या गोवा फॉरवर्डचा एक आमदार लवकरच भाजपचामध्ये प्रवेश करणार आहे. ही बातमी व्हायरल होत असतानाही, तुम्ही या बातमीचे खंडन केलेले नाही किंवा स्पष्टीकरण दिलेले नाही.” असे नोटीसमध्ये लिहिले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानी नोकरशाहीचे इम्रानविरुद्ध ‘बंड’
ओमिक्रोन झालेल्या रुग्णांच्या संपर्कातले आणखी पाच जण पॉझिटीव्ह
वानखेडेवर पडणार धावांचा पाऊस की वारुणराज फिरवणार सामन्यावर पाणी ?
शेवडे यांनी मांडलेली विषवल्ली शहरात आहे, त्याचा मुकाबला करावा लागेल
२०१७ च्या गोवा निवडणुकीपूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षात जाण्यापूर्वी विजय सरदेसाई हे त्यांच्या पक्षप्रमुखांप्रमाणेच एकेकाळी काँग्रेसचा भाग होते. त्यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळात असलेले राज्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांचा पराभव केला होता.