उद्धव ठाकरे कुटुंबियांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

भिडे यांची याचिका नामंजूर करत २५००० रुपयांचा दंड

उद्धव ठाकरे कुटुंबियांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्या  विरोधातील याचिका फेटाळण्यात आली आहे. हि याचिका तथ्यहीन मानून न्यायालयाने याचिकाकर्त्यांना २५ हजार रुपयांचा दंडपण ठोठावला आहे. त्यांच्या याचिकाकर्त्यांकडे कोणताच पुरावा नसल्यामुळे त्यांच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे.  हि याचिका तथ्यहीन असल्यामुळे खंडपीठाने हा कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग केला असे म्हंटले आहे. आणि याचिकाकर्त्या गौरी भिडे आणि अभय भिडे यांना २५००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. याचिका कर्त्या गौरी भिडे आणि अभय भिडे यांनी केलेल्या आरोपांबाबत ठोस पुरावा सादर केला नसल्याचे खंडपीठाने म्हंटले आहे.

एका प्रकाराने हि पुरावाहीन याचिका दाखल केली आहे ज्याच्या आधारे सीबीआय आणि ईडीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे कोणतेच निर्देश देता येत नाहीत शिवाय या याचिकेत प्रथमदर्शनी असे काहीच नाही ज्याच्या आधारावर केंद्रीय अन्वेषण यंत्रणा किंवा इतर कोणत्याही एजन्सीला कोणतेच तपास करण्याचे निर्देश देता येणार नाहीत.  मुंबई महापालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराचा थेट संबंध ठाकरे कुटुंबियांच्या वाढलेल्या संपत्तीशी दावा करणारा युक्तिवाद खंडपीठाने आपला निकाल देताना फेटाळून लावला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि ठाकरे कुटुंबीयांची मालमत्ता यांचा कोणताच संबंध दिसत नसल्याचे म्हंटले आहे. म्हणून हि याचिका फेटाळत असल्याचे खडपीठाने मांडले आहे. या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या वतीने जेष्ठ वकील अस्पि चिनॉय यांनी दावा केला होता कि, हि याचिका फक्त अनुमान आणि निराधार तथ्यांवर दाखल केली गेली होती त्यामुळे ती ऐकूच नये  असे सांगितले आहे.

हे ही वाचा:

म्यानमारमध्ये बौद्ध भिक्षुंना घातल्या गोळ्या

मुंबई-गोवा तेजतर्रार प्रवासासाठी आणखी नऊ महिने प्रतिक्षा

H3N2 व्हायरस संसर्गावर कोरोनालस प्रभावी?

काही आमदार परत येतील म्हणूनच १६ आमदारांना नोटीस दिली

हि याचिका म्हणजे कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे , त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि त्याचा भाऊ यांच्या संपत्तीची चौकशी करण्यासाठी ईडी आणि सीबीआयला निर्देश द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. भिडे यांनी याचिकेत असा दावा केला आहे कि, ठाकरे कुटुंबीयांनी आधीच अधिकृत संपत्तीची घोषणा केली नाही. त्यांचा व्यवसाय , नोकरी आणि उत्पन्नाचे स्रोत आहेत. तरीही ते मुंबई आणि रायगड मध्ये कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे मालक कसे आहेत

 

 

Exit mobile version