मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. त्यांना आयकर विभागाने १० मार्चला उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस ३ मार्चलाच पाठवली होती. इकबाल सिंग यांना मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या प्रकरणासंबंधी मुंबईच्या आयुक्तांना नोटीस पाठवण्यात आली होती.
स्थायी समिती सदस्य यशवंत जाधव यांच्या चौकशीसंदर्भात आयटी कायदा १९६१ च्या अंतर्गत मुंबई महापालिका आयुक्तांना नोटीस पाठवली होती. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना १० मार्चला आयटीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासंदर्भात नोटीस दिली होती. आयटीने इकबाल चहल यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये २५ फेब्रुवारी मुंबई महापालिकेतील पदाधिकारी आणि कंत्राटदारांवर छापे टाकले होते. त्यासंदर्भातच आयटीने इकबाल चहल यांच्याकडून काही कागदपत्रे मागवली आहेत.
इकबाल यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी तीनशे कोटींच्या टेंडरसंदर्भात आरोप केले आहेत. इकबाल यांना नोटीस आल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनावर निशाणा साधला होता. सोमय्या म्हणाले, ” यशवंत जाधव प्रकरणात महापालिकेचे तीन वरिष्ठ अधिकारी आणि शिवसेनेचे पाच वरिष्ठ नेत्यांचा या प्रकरणात हात आहे.”
हे ही वाचा:
नागराज मंजुळे आता डॉक्टर नागराज मंजुळे!
“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा
‘इक्बाल सिंग चहल यांच्या नातेवाईकांकडून सोनू निगमला धमकी’
“तेजस ठाकरेसुद्धा ‘त्या’ कंपनीत पार्टनर” किरीट सोमय्यांचा दावा
शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी काही दिवसांपूर्वी आयकर विभागाची धाड पडली होती.जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. यशवंत यांनी १५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हस्तांतरण केली असल्याची सांगण्यात आली आहे.