भाजपाच्या रेलभरो आंदोलनाचा मुंबईत एल्गार

भाजपाच्या रेलभरो आंदोलनाचा मुंबईत एल्गार

मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर ठाकरे सरकारने निर्बंध शिथील करायला सुरूवात केली आहे. अनेक कार्यालयांमध्ये देखील १०० टक्के उपस्थितीला परवानगी दिली आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असलेला लोकल प्रवास करायला ठाकरे सरकारने परवानगी दिलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत ठाकरे सरकार बघत असताना, सरकारच्या आडमुठेपणा विरोधात भाजपाचे ‘रेलभरो आंदोलन’ चांगलेच पेटलेले पहायला मिळाले. भाजपाने सविनय नियमभंग करत रेल्वेने प्रवास करायला सुरूवात केली आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करण्याची परवानगी असावी अशी मागणी सातत्याने भाजपाकडून केली जात आहे.

ठाकरे सरकारने निर्बंध शिथिल केले असले तरीही लोकल प्रवासाला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना प्रवास करणे जिकिरिचे झाले आहे. त्यामुळे कार्यालय गाठणे मुश्किल झाले आहे. न्यायालयाने फटकारल्यानंतरही दोन डोस घेतलेल्या नागरिकांना देखील लोकल प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिलेली नाही. त्याविरोधात भाजपाने ठिकठिकाणी आंदोलन छेडले आहे.

हे ही वाचा:

सलग सातव्यांदा आरबीआयकडून रेपोरेटे जैसे थे

सर्वोच्च न्यायालयाचा अंबानींना दणका, काय आहे प्रकरण?

राज्यात फक्त काय’द्यायचे’ राज्य आहे का?

परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदर पुनावाला यांचा मोठा निर्णय

चर्चगेट, घाटकोपर, कांदिवली, ठाणे अशा विविध ठिकाणी भाजपाचे नेते आंदोलन करत आहेत. विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी चर्चगेट स्थानकातून रेल्वे प्रवास केला. त्याबद्दल त्यांना सुमारे २०० रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना देखील धक्काबुक्की करण्यात आली, त्याचा देखील दरेकरांकडून निषेध व्यक्त करण्यात आला

भाजपाचे विविध नेते विविध ठिकाणी आंदोलन करत होते. चर्चगेट येथे प्रविण दरेकर यांनी आंदोलन केले तर कांदिवली येथे भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आंदोलन केले. त्याबरोबरच घाटकोपर आणि ठाणे येथे देखील भाजपाकडून आंदोलन करण्यात आले होते. ठाण्यातील आंदोलनामध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्यासह आमदार संजय केळकर, ठाणे मनपा गटनेते मनोहर डुंबरे, ठाणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा आणि नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेवक सुनेश जोशी आणि संजय वाघुले यांचा समावेश होता. या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले. त्याशिवाय आमदार अतुल भातखळकर यांना देखील पोलिसांकडून बळाचा वापर करून अटक करण्यात आली.

Exit mobile version