27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणसलमान खुर्शीद यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

सलमान खुर्शीद यांनी पुन्हा उधळली मुक्ताफळं

Google News Follow

Related

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वावर मुक्ताफळं उधळली आहेत. त्यांच्या नवीन पुस्तकाने पुन्हा एकदा मोठा वाद तयार झाला आहे. कारण त्यांनी ISIS आणि बोको हराम सारख्या संघटनांची तुलना हिंदुत्वाशी केली आहे. दिल्लीचे दोन वकील विवेक गर्ग आणि विनीत जिंदाल यांनी सलमान खुर्शीद यांच्याविरोधात हिंदुत्वाची बदनामी केल्याच्या तक्रारी दिल्ली पोलिसांकडे दाखल केल्या आहेत.

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ हे पुस्तक आहे. बुधवारी पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यात काँग्रेस नेते पी चिदंबरम, दिग्विजय सिंह आदी उपस्थित होते.

“सनातन धर्म आणि ऋषी आणि संतांना ज्ञात शास्त्रीय हिंदू धर्म हिंदुत्वाद्वारे बाजूला ढकलला जात आहे, सर्व मानकांनुसार, अलीकडील वर्षांच्या ISIS आणि बोको हराम सारख्या गटांच्या जिहादी इस्लामप्रमाणेच हिंदुत्व आहे.” पुस्तकाचा एक अध्याय. ‘The Saffron Sky’ शीर्षक असलेला आहे. ज्यामध्ये खुसरशीद यांनी हे लिहिले आहे.

हे ही वाचा:

ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर

WHO: सगळीकडे कोविड केसेस कमी, अपवाद फक्त…

राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…

मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट

तक्रारीत विवेक गर्ग म्हणाले, “हे काँग्रेसची खरी मानसिकता प्रतिबिंबित करते. कारण ते हिंदूंशी कृत्रिम समानता निर्माण करून ISIS च्या कट्टरपंथी घटकांना कायदेशीर ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पुस्तकात छापलेले त्यांचे विधान स्वतःच स्पष्टीकरणात्मक आहे आणि त्यांच्या विचाराचा स्पष्टपणे खुलासा करते.” “आरोपींनी केलेल्या विधानातील मजकूर हिंदू धर्म ISIS आणि बोको हराम यांच्या समतुल्य असल्याचा दावा करतो, जे दहशतवादी गट आहेत. हे संपूर्ण हिंदू समुदायासाठी एक अतिशय संतापजनक आणि बदनामीकारक विधान आहे आणि त्यांच्या मूल्यांवर आणि समाजाबद्दलच्या सद्गुणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करते. ISIS आणि बोको हराम यांच्याशी हिंदू धर्माची समानता ही नकारात्मक विचारसरणी म्हणून समजली जाते आणि हिंदू धर्म हिंसक, अमानुष आणि अत्याचारी आहे असे दाखवण्याचा प्रयत्न यातून दिसतो.” असे जिंदाल यांच्या तक्रारीत लिहिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा