राहुल गांधींच्या सभेपूर्वी मोठा पेच, काँग्रेसच्या बॅनरवर भाजपच्या उमेदवाराचा फोटो!

चूक लक्षात येताच कार्यकर्त्यांची सारवासारव

राहुल गांधींच्या सभेपूर्वी मोठा पेच, काँग्रेसच्या बॅनरवर भाजपच्या उमेदवाराचा फोटो!

मध्यप्रदेशातील मांडला येथे राहुल गांधींची आज (८ एप्रिल) रॅली पार पडणार आहे.तत्पूर्वी तेथील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंचावर लागलेल्या बॅनरवरून केंद्रीय मंत्री आणि भाजप उमेदवार फग्गन सिंग कुलस्ते यांचा फोटो झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

वास्तविक काँग्रेस नेते राहुल गांधी आज मांडला लोकसभा मतदारसंघातील धानोरा गावात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत आणि काँग्रेस उमेदवार ओंकार सिंग यांच्या बाजूने वातावरण तयार करणार आहेत.राहुल गांधी यांच्या निवडणूक भाषणापूर्वी मुख्य मंचावर लावण्यात आलेल्या फ्लेक्समध्ये काँग्रेस नेत्यांसोबत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार फग्गन सिंग कुलस्ते यांचाही फोटो लावण्यात आला होता.

हे ही वाचा..

ही जागा काँग्रेसचीच; सांगलीचे इच्छुक विशाल पाटील वैतागले!

हिंदू तरुणाला इस्लाम धर्म स्वीकारून कलमा वाचायला लावला!

“संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार”

बीआरएस नेत्या के.कवितांना कोर्टातून मोठा झटका!

विशेष म्हणजे फग्गन सिंग कुलस्ते यांच्या विरोधात राहुल गांधी प्रचारासाठी मांडला येथे पोहचत आहेत.कार्यकर्त्यांना चूक लक्षात येताच भाजप नेते कुलस्ते यांचा फोटो झाकून काँग्रेसचे आमदार रजनीश हरवंश सिंह यांचा फोटो लावण्यात आला.

दरम्यान, काँग्रेसने मांडला लोकसभा मतदारसंघातून ओंकार सिंग यांना संधी दिली आहे.राहुल गांधी यांच्या रॅलीपूर्वी एक दिवस आधी पंतप्रधान मोदी यांनी जबलपूरमध्ये मेगा रोड शो आयोजित करून निवडणूक प्रचाराची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते.दरम्यान, मध्य प्रदेशात लोकसभेच्या निवडणुका चार टप्प्यात होणार आहेत.पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल, त्यानंतर २६ एप्रिल, ७ मे आणि १३ मे रोजी होणार आहे.

Exit mobile version