गुजरात विधानसभेचा आज निकाल जाहीर केला जातं आहे. या निकालामध्ये गेल्या २७ वर्षांपासून सत्तेत असलेला भाजपा पक्ष आघडीवर आहे. तर या निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होतं आहे. काँग्रेसला वीसचा आकडाही गाठता आलेला नसून, हा आकडा सातत्याने बदलत आहे.
गुजरात विधानसभा २०१७ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला ७७ जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपाने त्यावेळी ९९ जागांवर विजय मिळवला होता. २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपा काँग्रेसपेक्षा फक्त २२ जागांनी पुढे होता. मात्र, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव होताना दिसतं आहे. भाजपाने २०१७ च्या निवडणूक निकालाशी तुलना केली तर भाजपाने १५० चा आकडा गाठला आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालानुसार, १८२ जागांपैकी भाजपाला १५२ जागांवर बहुमत आहे. भाजपाने बहुमताचा आकडा पार केला असून, बहुमतापेक्षा भाजपा जवळपास ६० जागांनी पुढे आहे. तर काँग्रेस १८, आप सात आणि अपक्ष पाच जागांवर आघाडीवर आहेत.
हे ही वाचा:
आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका
भाजपाची काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
भाजपाने गुजरातमध्ये स्वतःचा विक्रम मोडला आहे. भाजपाने गुजरातमध्ये विरोधी पक्षासाठीसुद्धा जागा ठेवलेली नाही. गुजरातमध्ये जनतेने आणि भाजपा कार्यकर्त्यांनी विजय साजरा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा गुजरातमध्ये सातव्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये तिथे चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे.