मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

मोदी सरकारचा मोठा निर्णय, ८० कोटी नागरिकांना मिळणार मोफत धान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ एप्रिलला देशातील ८० कोटी जनतेला गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य पुरवठा करण्याची घोषणा केली होती. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा तिसरा टप्पा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेंअतर्गत पात्र नागरिकांना दोन महिन्याचं धान्य मोफत देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटनं धान्य वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.

केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या निर्णयाचा फायदा देशातील ७९ कोटी ८८ लाख जनतेला होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोपत देण्यात येणार आहे. देशातील विविध राज्यातील अन्नपुरवठा आणि सार्वजनिक वितरण विभागांद्वारे याच वितरण करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

आता व्हॉट्सऍपवर शोध जवळचे लसीकरण केंद्र

आदु… आता तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे कोरोनामुळे निधन

शोपियानमध्ये तीन घुसखोरांचा खात्मा

केंद्र सरकारनं दोन महिन्यांचं धान्य ७९ कोटी ८८ लाख लोकांना देण्याचं जाहीर केलेले आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारवर २५ हजार ३३३ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतर गरीब कल्याण योजनेची घोषणा केली होती. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत धान्य वितरण सुरु कऱण्यात आलं आहे

Exit mobile version