मुंबई न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेमडेसिवीर आणि टोसिलीझुमाब इंजेक्शन बाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायलयाने या दोन्ही औषधांच्या उपलब्धतेची माहिती एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रुग्णांचा शोधाशोध करण्याचा अमुल्य वेळ वाचेल.
न्यायमुर्ती झाका हक आणि न्यायमुर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर न्यायालयाने स्वतः पुढाकार घेऊन दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्र शासनाने नागपूरमध्ये लवकरच एक ऑक्सिजन उत्पादन केंद्र चालू करणार असल्याची माहिती देखील दिली.
हे ही वाचा:
उद्धव यांच्यापेक्षा राज एक पाऊल पुढे!
राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?
योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण
शिवभोजन सेंटर उघडी राहणार कारण शिवसेनेचे कार्यकर्ते सेंटर चालवतात
१२ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत, शासनाने या दोन्ही इंजेक्शनचा तुटवडा असल्यासे न्यायलयाला सांगितले होते. त्यावर न्यायालयाने या औषधांची उपलब्धता दर्शविणारे संकेतस्थळ चालू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १३ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत शासनाने असे संकेतस्थळ चालू करण्याचे मान्य केले होते.
या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त, नागपूर यांना नागपूरातल्या ज्या सर्व औषध विक्रेत्यांना सिप्ला फार्मासुटिकलकडून पुरवठा केला जातो त्यांच्याकडून या औषधाच्या उपलब्धतेबद्दल माहिती घेऊन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. त्याबरोबरच जे औषध विक्रेते सहकार्य करणार नाहीत त्यांच्याशी सक्तीने व्यवहार करण्याचे आदेश दिले.
या बरोबरच न्यायालयाने लवकरात लवकर एक कोविड केंद्र नागपुरातील मानकापूर स्टेडियमवर चालू करण्याचे देखील आदेश दिले.