जळगावात शिंदे गट ४०० पार…ठाकरे गटाला धक्का!

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश

जळगावात शिंदे गट ४०० पार…ठाकरे गटाला धक्का!

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.जळगाव जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांसह ४०० कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.रविवारी (१४ एप्रिल) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुलढाण्यामध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला.

राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे.निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते, कार्यकर्ते स्वतःचे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात उडी मारत आहेत.याचा फटका सर्व पक्षांना बसतो.असाच फटका उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाला बसला आहे.जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा परिसरातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

हे ही वाचा:

के कविता यांना २३ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

काँग्रेससाठी जाहीरनामा फक्त कागद पण आमच्यासाठी ‘मोदींची गॅरेंटी’!

ताब्यात घेतलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देणार

संयुक्त राष्ट्र प्रमुखांकडून इस्रायलवरील इराणच्या हल्ल्याचा निषेध!

तब्बल ४०० कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.पक्षप्रवेशावेळी मंत्री गुलाबराव पाटील, बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार चिमणराव पाटील देखील उपस्थित होते. बुलढाणामधील रेसिडेन्सी क्लबमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, निवडणुकीच्या कामात कितीही व्यस्त असलो तरी आम्ही दररोज सर्व माहिती घेतो.आपले सरकार सामान्य जनतेचं आणि शेतकऱ्यांचं सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिले आहे.दरम्यान, ४०० कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Exit mobile version