‘इंडी’ आघाडी फुटली, लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा ‘एकला चलोचा नारा’!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली घोषणा

‘इंडी’ आघाडी फुटली, लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींचा ‘एकला चलोचा नारा’!

लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष ‘इंडी आघाडीला’ मोठा झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी टीएमसी लोकसभा निवडणूक एकट्याने लढणार असल्याचे जाहीर केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या घोषणेने देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी एकजूट करत इंडिया आघाडीची स्थापना केली होती. पण आता याच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.ममता बॅनर्जी यांनी एकला चलोचा नारा दिल्याने इंडी आघाडीतून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा:

कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न जाहीर करून जदयू, राजद पक्षांच्या मुद्द्यातील हवा काढली

मागासवर्गीयांसाठी लढणारे, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न

‘राम मंदिर उद्घाटन माझ्यासाठी अध्यात्मिकता; राजकारण नव्हे’

संरक्षण प्रकल्पांमध्ये खर्चवाढ अन् विलंब नको!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार आहोत. आम्ही इंडिया आघाडीत काही प्रस्ताव दिले, तेसुद्धा फेटाळले गेले आहेत. माझा प्रस्ताव मान्य झाला नाही, त्यामुळे आता आपण एकटेच निवडणूक लढवू.त्या पुढे म्हणाले की, राहुल गांधींची सभा होत आहे, आम्ही भारत आघाडीत असूनही आम्हाला त्याची माहिती देण्यात आली नाही.

दरम्यान, ममता बॅनर्जी इंडी आघाडीतून बाहेर पडल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळे इंडी आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

Exit mobile version