मुख्यमंत्री योगींच्या पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा!

मुख्यमंत्री योगींच्या पहिल्याच बैठकीत मोठी घोषणा!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांचा काल शपथविधीचा सोहळा पार पडला. त्यानंतर आजच्या पहिल्याच योगी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत योगी सरकारने युपीच्या जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. या बैठकीमध्ये योगिंनी कोरोना काळात सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेला तीन महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की,  मोफत धान्य देण्याची ही योजना कोरोना काळात सुरु करण्यात आली होती. गरजूंना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. मोफत रेशन योजनेवर सुमारे ३ हजार २७० कोटी रुपये खर्च केले जातात. यापुढेही ही योजना सुरु ठेवण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात घेतला असल्याचे योगी म्हणाले.

युपीमध्ये मोफत रेशन वाटपाचे जवळपास १५ कोटी लाभार्थी आहेत. त्याचा विचार करूनच योगी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सध्या ही पुढील तीन महिने योजना युपीमध्ये कार्यरत राहणार आहे. महागाई वाढल्याने मोफत रेशन देण्याचा योगी सरकारने निर्णय घेतला आहे. ही योजना किती काळ वाढवायची यावर अजून चर्चा सुरु आहे. योजनेत एकाच वेळी वाढ न करता दोन ते तीन टप्प्यांत वाढविण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

आजपासून आयपीएलचा रणसंग्राम; चेन्नई, कोलकाता आमनेसामने

उत्तर प्रदेशानंतर आता दापोलीत चालणार बुलडोझर?

‘जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो कायदेश्वर’

‘हातोडा’ घेऊन सोमय्या दापोलीकडे निघाले

मोफत रेशन योजनेअंतर्गत लाभार्थींना गहू आणि तांदूळ, एक लिटर तेल, एक किलो हरभरा, मीठ दिले जाणार आहे. आतापर्यंत योगी सरकारने डिसेंबर ते मार्चपर्यंत मोफत रेशन दिले आहे. यापूर्वी कार्डधारकांकडून गव्हासाठी किलोमागे २ रुपये आणि तांदळासाठी ३ रुपये प्रतिकिलो आकारले जात होते. तरी आता त्याचा खर्चही राज्य सरकार उचलणार आहे.

Exit mobile version