…आणि बायडेन मोदींना म्हणाले, मला तुमची स्वाक्षरी घ्यायला हवी!

जी ७ परिषदेदरम्यान झालेल्या भेटीत बायडेन यांनी व्यक्त केली इच्छा

…आणि बायडेन मोदींना म्हणाले, मला तुमची स्वाक्षरी घ्यायला हवी!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी मागितली. मोठ्या जनसमुदायाला ते कसे काय नियंत्रित करतात, याचे कौतुक करत बायडेन यांनी मोदी यांच्याकडे स्वाक्षरीची मागणी केली.

क्वाड संघटनेच्या बैठकीसाठी विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष एकत्र आले आहेत. त्यावेळी बायडेन यांनी मोदींची भेट घेतली. त्यावेळी बायडेन यांनी सांगितले की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढील महिन्यात वॉशिंग्टनला दौरा आहे त्यासाठी अनेक अग्रगण्य नागरिकांनी विनंती केली आहे की, आम्हाला पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे. पण या सगळ्यांना सहभागी करण्याचे एक आव्हानच आमच्यासमोर आहे.

जपानमधील हिरोशिमा येथे ही क्वाड देशांची बैठक होत असून त्यात बायडेन हे मोदींजवळ आले आणि त्यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची विनंतीपत्रे आलेली असल्याचे सांगितले.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस हेदेखील त्यावेळी उपस्थित होते. सिडनीत २०हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करता येऊ शकते. पण तरीही आपण एवढ्या लोकांच्या व्यवस्थेचे आव्हान पेलू शकत नाही. बायडेन आणि अल्बानीस यांनी अशा पद्धतीच्या आव्हानांबाबत पंतप्रधानांना सांगितले.

अल्बानीस यांनी नंतर एक आठवण सांगितली की, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ९० हजार लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कसे स्वागत केले, याची आपल्याला अजूनही आठवण आहे.

हे ही वाचा :

१०० तासांत १०० किलोमीटरचा एक्सप्रेस वे बांधला !

धरसोड कसली? हे आधीच ठरलं होतं…

सुषमा अंधारेंनी ठाकरेंवर असे काय गारुड केले?

”वाघशीर”; समुद्री चाचण्यांसाठी झाली सज्ज !

त्यावर बायडेन म्हणाले की, मोदींची यासाठी मला स्वाक्षरीच घ्यावी लागेल. मोदी आणि अल्बानीस हे यावर्षी मार्च महिन्यात गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यावेळी भारत ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे आयोजन या स्टेडियमवर करण्यात आले होते. त्यावेळी अल्बानीस यांनी खच्चून भरलेले स्टेडियम पाहिले होते. जपानमध्ये सध्या जी ७ सदस्य राष्ट्रांची परिषद होत असून तिथे नरेंद्र मोदी गेलेले आहेत.

 

Exit mobile version