25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणभूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७वे मुख्यमंत्री पदभार स्वीकारला

भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७वे मुख्यमंत्री पदभार स्वीकारला

Google News Follow

Related

गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी शपथ घेतली. गुजरातच्या राजभवनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाला काही दिवसांनी शपथ दिली जाईल असं सांगितलं जात आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर भूपेंद्र पटेल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन, ‘भूपेंद्र भाई यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल शुभेच्छा. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि त्याचं काम पाहिलं आहे. मग ते भाजप पक्ष संघटना, नागरिक प्रशासन किंवा समाजसेवा असेल. ते निश्चितपणे गुजरातचा विकास मार्ग समृद्ध करतील’, असं म्हटलंय.

भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. त्यांचं पाटीदार समाजावर वर्चस्व आहे. पटेल हे ५९ वर्षाचे आहेत. पटेल हे अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे. ते व्यवसायाने बिल्डर आहेत. विशेष म्हणजे ते पहिल्यांदाच आमदार झाले असून त्यांनी कधीही मंत्रीपद भूषविलेले नाही.

हे ही वाचा:

मुंबई ठाण्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज

हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे

देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, केरळमध्ये मात्र भयावह स्थिती

शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?

भूपेंद्र पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे. १९९९-२००० मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. २०१० ते २०१५ पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २०१५-१७मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तसेच २००८-१० मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते पटेल संघटनांच्या सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ट्रस्टीही आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्याने ते पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा